THE WHITE TIGER – द व्हाइट टायगर
₹295.00
Product Highlights
बलराम हलवाई, – ’द व्हाईट टायगर’ भारताच्या अंधेरनगरीतील एका खेड्यात, एका सायकल रिक्षा चालवणार्याच्या पोटी जन्म घेतलेला बलराम. कहाणीचा नायक! नोकर, तत्त्वज्ञ, उद्योजक आणि खुनीही. सात रात्रींच्या कालावधीत बलराम त्याची जीवनकहाणी सांगतोय… ही भारताच्या दोन रूपांची कहाणी आहे. एक अंधारातला भारत आणि दुसरा प्रकाशातला! अंधेरनगरीतून प्रकाशाकडे जाताना, एका ड्रायव्हरपासून एक अत्यंत यशस्वी व कुशल व्यावसायिक बनताना बलरामला कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, नीती-अनीतिच्या कल्पना कशा बाजूला ठेवाव्या लागतात आणि तरीही शेवटपर्यंत त्याचं कनवाळू हृदय आणि संवेदनशील मन कसं जागृत राहतं याची ही हृदयंगम कहाणी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.
Description
NARRATED BY BALRAM, A SELF-STYLED “ENTREPRENEUR” WHO HAS MURDERED HIS EMPLOYER, THE BOOK FOLLOWS HIS PROGRESS FROM CHILD LABOURER, VIA HUMILIATION AS A SERVANT AND DRIVER, TO A MYSTERIOUS NEW LIFE IN BANGALORE. BALRAM HIMSELF IS AN ENTICING FIGURE, WHOSE REASONS FOR MURDER BECOME COMPLETELY UNDERSTANDABLE BY THE END, BUT EVEN MORE IMPRESSIVE IS THE NITTY-GRITTY OF INDIAN LIFE THAT ADIGA UNEARTHS: THE CORRUPTION, THE CLASS SYSTEM, THE SHEER PETTY VICIOUSNESS.
Brand
ARAVIND ADIGA
Birth Date : 23/10/1974
अरिंवद अडिगा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९७४ साली मद्रास येथे झाला. त्यानंतर काही काळ ते भारतातच राहिले व तेथून पुढे ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इंग्लड अशा ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. सध्या ते मुंबईत असतात. द व्हाईट टायगर ही त्यांची पहिलीच कादंबरी आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात फायनान्शिअल टाइम्स मध्ये पत्रकार म्हणून झाली. फ्री-लान्स पत्रकारिता सुरू करण्याआधी तीन वर्षे ते टाइम मासिकासाठी दक्षिण आशियाचे बातमीदार म्हणून काम करत होते. आपल्या काहीशा बेफिकीर आणि धक्कादायक शैलीतून रेखाटलेल्या या कादंबरीतून धनिक वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांचं वास्तवातील जीवन, त्यांची लालसा, त्यांची वैषयिक वृत्ती, त्यांचा अहंकार यांचं कमालीचं वास्तववादी आणि अत्यंत यथार्थ चित्रण अडिगा यांच्या संवेदनक्षम लेखणीने केलं आहे. त्याचबरोबर समाजातील दुर्बल घटकाच्या पोटी जन्माला आलेल्यांना दैनंदिन जीवन जगताना पावलोपावली करावा लागणारा संघर्षसुद्धा त्यांनी येथे तितक्याच ताकदीने उभा केला आहे.

Reviews
There are no reviews yet.