THE SIMPLE TRUTH – द सिम्पल टूथ
₹540.00
Product Highlights
‘फोर्ट जॅक्सन’ या मिलिटरीच्या तुरुंगात ‘रूफस हाम्र्स’ हा कैदी एका लहान मुलीच्या हत्येच्या आरोपावरून गेली पंचवीस वर्षं आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. स्मरणशक्ती गमावलेल्या रूफसला फक्त ‘त्या’ प्रसंगाची स्मृती होती. त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या एका पत्राने त्याच्या विस्मरणशक्तीला हादरा बसला आणि त्याला चक्क ‘सर्व’ आठवायला लागलं. त्यानं सुप्रीम कोर्टाला त्याच्या वकिलामार्फत एक अपील केलं. ते कोर्टापर्यंत पोहोचलंच नाही. ते अपील पाहिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या मायकेल फिस्क या क्लार्कचा खून झाला. त्यानंतर आणखी एका क्लार्कचा खून, त्याच्या वकिलाचा–त्याच्या बायकोचा खून अशी खुनांची मालिका सुरू झाली. आपल्याला ‘न्याय’ मिळावा म्हणून केलेल्या रूफसच्या न पोहोचलेल्या अपिलावर सुप्रीम कोर्ट कसा निर्णय घेणार? मिलिटरीत घडलेल्या गुन्ह्यांबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे का? मायकेल फिस्कच्या भावाचा – जॉन फिस्कचा आणि मायकेलची सहकारी सारा इव्हान्स हिचा या प्रकरणात काय संबंध आहे? मिलिटरीच्या ज्या पत्रामुळे या प्रकरणाची सुरुवात झाली त्या पत्रात ‘विशेष’ असं काय होतं? कायद्यापुढे सर्व समान असतात. छोट-मोठे, गरीब-श्रीमंत, काळे-गोरे असा भेद करणं, प्रघात आहे म्हणून काहीही मान्य करणं, हे कर्तव्यदक्ष न्यायाधीश एलिझाबेथ नाइट यांना मान्य नव्हतं. सत्य उजेडात आलंच पाहिजे. कितीही दडवण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी जे बाहेर येतं ते असतं निखळ सत्य! असं त्यांचं मत होतं. ‘द सिम्पल ट्रूथ!’ राजकीय-सामाजिक जाणिवेतून मानवी मनाचा शोध घेणारी, मनाला स्पर्श करणारी अशी ही कादंबरी.
Description
SIZZLING DAVID BALDACCI`S NOVELS HAVE BEEN CALLED “SIZZLING” (USA TODAY) AND “SUPERIOR” (HOUSTON CHRONICLE). NOW BALDACCI IS BACK, WITH THE STORY OF A DEATH ROW INMATE, A SUPREME COURT CLERK, AND A CRIME THAT IS COSTING PEOPLE THEIR LIVES… TERRIFYING MICHAEL FISKE BROKE THE LAW WHEN HE TOOK RUFUS HARMS`S PRISON LETTER FROM THE SUPREME COURT. BUT HE ALSO SEALED HIS OWN FATE. NOW MICHAEL`S BROTHER, A COP TURNED ATTORNEY, IS COMING TO WASHINGTON TO FIND OUT WHY HIS BROTHER WAS MURDERED-AND WHAT IT HAD TO DO WITH A CRIME THAT RUFUS HARMS COMMITTED TWENTY-FIVE YEARS BEFORE… SIMPLY THE BEST IN HIS NEW NOVEL OF CORRUPTION, ROMANCE, FAMILY, AND JUSTICE AT THE HEART OF THE AMERICAN REPUBLIC, DAVID BALDACCI TAKES US ON A JOURNEY OF HARROWING CONSPIRACY-AND PROVES ONCE AGAIN THAT IN THE REALM OF SUSPENSE, HE IS IN A LEAGUE OF HIS OWN. THE SIMPLE TRUTH IT`S NEVER WHAT IT SEEMS…
Brand
DAVID BALDACCI
Birth Date : 05/08/1960
डेव्हिड यांचा जन्म सन १९६० मध्ये रिचमंड, व्र्हिजनिया येथे झाला. व्र्हिजनिया कॉमनवेल्थ विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र या विषयातून पदवी संपादित केली. नंतर त्यांनी व्र्हिजनिया विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते वॉशिग्टन डी.सी.मध्ये कॉर्पोरेट वकील म्हणून काम करू लागले. आता ते पूर्णवेळ लेखन करत असून त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्या आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह व्र्हिजनियामध्ये वास्तव्यास असतात.
Reviews
There are no reviews yet.