THE SATAN BUG – द सटन बग
₹300.00
Product Highlights
त्या लष्करी संशोधन केन्द्राभोवती ६०० फूट रुंदीचा मोकळा पट्टा. त्यानंतर अत्यंत उच्च दाब असलेल्या पाच विजेच्या तारा. त्यानंतर काटेरी तारांचे दुहेरी कुंपण. बाहेरच्या जगापासून ते संशोधन केन्द्र वेगळे झाले होते. पण इतके असूनही त्या केन्द्राच्या `ई` इमारतीमध्ये असलेल्या एका कुलूपबंद दारापलीकडे एक शास्त्रज्ञ मृत झाला होता. तिथेच एक नवीन लस संशोधित केली होती. ती लस लक्षावधी माणसांचे बळी घेऊ शकत होती. पण ती नवीन संशोधित लस तिथून गायब झाली…. त्या अति गूढ रहस्याचा छडा लागत नव्हता. ते सैतानी विषाणू अखिल मानवजातीचा बळी घेऊ शकत होते. अंगावर काटा आणणारी रहस्यमय कादंबरी श्री. अशोक पाध्ये यांनी आपल्या खास शैलीत मराठीत अनुवादित केली आहे.
Description
WHEN SHE WAS FOURTEEN, JASVINDER SANGHERA WAS SHOWN A PHOTO OF THE MAN CHOSEN TO BE HER HUSBAND. SHE WAS TERRIFIED. SHE`D WITNESSED THE TORMENT HER SISTERS ENDURED IN THEIR ARRANGED MARRIAGES, SO SHE RAN AWAY FROM HOME, GRIEF-STRICKEN WHEN HER PARENTS DISOWNED HER.SHAME IS THE HEART-RENDING TRUE STORY OF A YOUNG GIRL`S ATTEMPT TO ESCAPE FROM A CRUEL, CLAUSTROPHOBIC WORLD WHERE FAMILY HONOUR MATTERED MORE THAN ANYTHING – SOMETIMES MORE THAN LIFE ITSELF. JASVINDER`S STORY IS ONE OF TERRIBLE OPPRESSION, A HARROWING STRUGGLE AGAINST A PUNITIVE CODE OF HONOUR – AND, FINALLY, TRIUMPH OVER ADVERSITY.
Brand
ALISTAIR MACLEAN
Birth Date : 21/04/1922
Death Date : 02/02/1987
अॅलिस्टर मॅक्लीन यांचा जन्म २८ एप्रिल, १९२२ रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झाला. त्यांचे बालपण आणि तारुण्य डेव्हिऑट येथे गेले. १९४१ साली त्यांनी रॉयल नेव्हीमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या महायुद्धात भागही घेतला. १९४६ साली नौदलातून बाहेर पडल्यानंतर ते ग्लासगो विद्यापीठ येथे इंग्रजीचा अभ्यास करू लागले. १९५३ साली त्यांनी पदवी संपादन केली आणि रुदरग्लेन येथे शिक्षक म्हणून काम करू लागले. विद्यापीठात अध्ययन करताना अर्थार्जनासाठी ते लघुकथा लिहू लागले. १९५४ साली डिलिअॅस ही कथा लिहून त्यांनी एका लेखनस्पर्धेत बक्षीस मिळवले. कॉलिन्स प्रकाशन संस्थेने त्यांच्यासमोर कादंबरी लेखनाचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव स्वीकारून त्यांनी युद्धात आलेल्या अनुभवांवर एच.एम.एस. यूलिसिस ही कादंबरी लिहिली. या कादंबरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि लवकरच मॅक्लीन यांनी पूर्ण वेळ युद्धकथा, गुप्तहेरकथा आणि साहसकथा लिहिण्यास सुरुवात केली. मुखपृष्ठावर अॅलिस्टर मॅक्लीन हे नाव असल्याने नाही तर साहित्यच दर्जेदार असल्याने पुस्तके लोकप्रिय आहेत, हे दाखवून देण्यासाठी मॅक्लीन यांनी इयान स्टुअर्ट या टोपणनावाने दोन कादंबऱ्या लिहिल्या. या दोन्ही कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. समकालीन लेखकांपेक्षा मॅक्लीन यांची लेखनशैली वेगळी होती. प्रणयाची भडक वर्णने त्यांच्या साहित्यात आढळत नाहीत. त्यांच्या मते अशी वर्णने मूळ कथेचा वेग आणि थरारकता यांना मारक ठरतात. निसर्ग; त्यातही समुद्र आणि उत्तर आाQक्र्टकच्या पार्श्वभूमीचा त्यांच्या कादंबऱ्यामधून विशेष वापर केला गेला आहे. मॅक्लीन यांच्या २८ कादंबNया आणि काही कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. स्वत:च्या कादंबNयांवर आधारित काही पटकथाही त्यांनी लिहिल्या आहेत. १९८३ साली ग्लासगो विद्यापीठाकडून त्यांना साहित्यासाठी डॉक्टरेट देण्यात आली. २ पेÂब्रुवारी, १९८७ साली मॅक्लीन यांचा मृत्यू झाला.
Reviews
There are no reviews yet.