THE PROPHET MURDERS – द प्रॉफेट मर्डर्स
₹200.00
Product Highlights
इस्तंबूलमध्ये काहीतरी विलक्षण घडत आहे. एक पिसाट खुनी मोकाट सुटला आहे आणि शहरातील ट्रान्सव्हस्टाईटचे एकापाठोपाठ एक खून होत चालले आहेत. प्रत्येक खुनानंतर परिस्थितीचा गुंता वाढत चाललाय. या कथानकाचा नायक हा इस्तंबूलच्या रंगेल जीवनातील एक प्रख्यात असामी असतो. तो दिवसा संगणक-तज्ज्ञ व रात्री ट्रान्सव्हस्टाईट असे दुहेरी आयुष्य जगत असतो. दिवस मावळल्यावर ओठांना लिपस्टीक लावून स्त्री-वेशात तो या खुनांचा शोध घ्यायचं ठरवतो खरं; पण खुनाच्या मागे असलेल्या माथेफिरू शक्तींचा सामना करणं वाटतं तेवढं सोपं नसतं आणि प्रकरण अंगावर शेकण्याची वेळ येते. कथानायिकेच्या रूपातील आपला कथानायक त्यातून मोठ्या चातुर्याने मार्ग काढतो. ट्रान्सव्हस्टाईट, समलिंगी वेश्यांच्या अनोख्या जीवनावर आधारित विनोदी धाटणीची चातुर्यकथा. अशा प्रकारचा किंचित चावट पण प्रसंगनिष्ठ व बौद्धिक विनोद मराठीत प्रथमच येत आहे. ही कथा तुर्की आणि युरोपियन संस्कृतीचा संगम म्हणून प्रसिद्ध असलेल्या इस्तंबूल शहरात घडते. कथानकाच्या ओघात बॉस्फोरच्या निळ्याशार समुद्रकाठी वसलेले इस्तंबूल शहर व तुर्की संस्कृतीचा परिचय होतो. बोरेक आणि राकीची चव चाखून पाहावी असा मोह होतो. युरोव्हिजन गाजवणा-या तुर्की गाण्यांचे सूर ऐकू येऊ लागतात आणि आपले पाय नकळत ठेका धरतात… ‘यालारिम यालारिम यालारिम…’
Description
“AS REFRESHING AS COOKIES AND COLD LEMONADE ON A SUMMER DAY. I WISH THERE WAS A TURKISH ALMODOVAR TO FILM ALL THESE NOVELS ONE DAY.”—PERIHAN MAGDEN, AUTHOR OF 2 GIRLS. THE FIRST IN A NEW TURKISH DETECTIVE SERIES. A KILLER IS ON THE LOOSE IN ISTANBUL AND KILLING TRANSVESTITES. OUR PROTAGONIST—FELLOW TRANSVESTITE, NIGHTCLUB OWNER, AND GLAMOUR-PUSS EXTRAORDINAIRE—TURNS INTO AN INVESTIGATOR IN THE SEARCH FOR THE KILLER. IT’S A TOUGH CASE—CAN SHE END THE SLAUGHTER WITHOUT BREAKING A NAIL?
Brand
MEHMAT MURAT SOMAR
यांचा जन्म १९५९मध्ये अंकारा येथे झाला. मध्यपूर्व विश्वविद्यालयातून औद्योगिक अभियांत्रिकीमधील पदवी घेतल्यानंतर अभियंता म्हणून त्यांनी काहीकाळ काम केले. त्यानंतर ते दीर्घकाळपर्यंत बँकिंग क्षेत्रात होते. १९९४पासून ते व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करत आहेत. व्यवस्थापन कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर ते विविध औद्योगिक कंपन्यांसाठी अभ्याससत्र घेतात. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्याची मालिका हॉप-सिकी-याया या नावाने ओळखली जाते. असे म्हणतात की, हमाममध्ये शाही स्नान घेऊन उरलेल्या फावल्या वेळात त्यांनी सहा कादंबऱ्या लिहिल्या. द किस मर्डर ही त्यांपैकीच एक. ते सध्या इस्तंबूलमध्ये राहतात.
Reviews
There are no reviews yet.