THE KITE RUNNER – द काईट रनर
₹320.00
Product Highlights
’द काइट रनर’ ही कथा आहे आमिर आणि हसन या दोन मुलांची. आमिर हा उच्चभ्रू श्रीमंत घराण्यात जन्मलेला मुलगा. ज्याला स्वत:मध्ये असणाऱ्या उणिवांवर मात करायची आहे. हसन आमिरचा चाकर आहे. या दोघांची मैत्री जगावेगळी आहे. त्यांचं स्वत:चं असं भावविश् व आहे. आपल्या मालकावर प्रामाणिकपणे प्रेम करणारा हसन सदैव त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. मात्र एका संध्याकाळी घडलेल्या भयानक घटनेमुळे या दोघांचे भावविश् व उद्ध्वस्त होऊन जाते. खालिद हुसैनी यांची खिळवून ठेवणारी प्रेरणादायक कथा.
Description
AMIR, A TWELVE YEAR OLD BOY DECIDES TO PARTICIPATE AND WIN THE LOCAL KITE RACE JUST TO GET PRAISED FROM HIS FATHER. HIS LOYAL FRIEND HASAN PROMISES TO HELP HIM. BUT SOMETHING HAPPENS ON THE EVENING OF THE KITE RACE CHANGING THE LIVES OF BOTH FRIENDS. IN 1970, WHEN THE RUSSIAN ARMY INVADED AFGHANISTAN, AMIR`S FAMILY HAD TO FLEE FROM THEIR COUNTRY. WHILE IN AMERICA, AMIR ALWAYS FELT THAT ONE DAY HE HAS TO GO BACK TO HIS HOMETOWN, THE PLACE FROM WHERE HE HAS HAD TO FLEE AWAY. HE KNEW THAT THE RICH LIFE IN THIS NEW WORLD WOULD NEVER GIVE HIM PUNISHMENT FOR THE DEEDS HE DID IN HIS PAST, THE UNPARDONABLE SIN.
Brand
KHALED HOSSEINI
Birth Date : 04/03/1965
खालिद हुसैनी यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबूल येथे ४ मार्च, १९६५ साली झाला. त्यांचे वडील परराष्ट्र मंत्रालयात राजनैतिक अधिकारी होते आणि आई काबूल येथील एका शाळेत फारसी व इतिहास शिकवत असे. १९७६ साली त्यांची बदली पॅरिसमधे झाली. १९८० मधे हुसैनी कुटुंबीयांना अफगाणिस्तानात परतायचे होते, पण तोपर्यंत कम्युनिस्ट कारवाया आणि सोव्हिएत सैन्याने केलेले आक्रमण, यामुळे त्यांना अमेरिकेत आश्रय घ्यावा लागला. खालिद यांनी तेथेच आपले शालेय व मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. मेडिकलची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी लिखाण सुरू केले. २००३ साली आलेली द काइट रनर ही त्यांची पहिली कादंबरी. ४८ देशांमधे प्रकाशित झालेली ही कादंबरी अल्पावधीतच बेस्टसेलर ठरली. २००६ साली त्यांना युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सीतर्फे सदिच्छा-दूत म्हणून गौरवण्यात आले. आपल्या खालिद हुसैनी फाउंडेशन च्या माध्यमातून ते मानवहितकारी बाबींसाठी झटतात.
Reviews
There are no reviews yet.