THE FACE OF DEATH – द फेस ऑफ डेथ
₹500.00
Product Highlights
सीरिअल किलर्सना पकडण्यात नावाजलेली एफबीआय एजंट स्मोकी बॅरेटची नवी साहसकथा. “मला स्मोकी बॅरेटशी बोलू द्या, नाहीतर मी स्वत:लाच गोळ्या घालून घेईन.’` सोळा वर्षांची सारा कानशिलावर पिस्तूल ठेवून स्मोकीची वाट पाहतेय. तिच्या घरात तीन खून पडलेत आणि ते खून आपल्याला अनेक वर्षांपासून त्रास देणा-या अनोळखी खुन्याने केलेत, असे तिचे म्हणणे आहे. पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. आजपर्यंत कोणीही नाही…. एफबीआयच्या लॉस एंजलिसमधील शाखेच्या गुन्हे विभागाची प्रमुख स्मोकी बॅरेट आणि तिच्या टीममधल्या हुशार माणसांवर या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास जिद्दीने करण्यामागे स्मोकीची वैयक्तिक कारणंही आहेत. आपल्या कुटुंबाच्या हत्याकांडातून सावरत असतानाच दत्तक घेतलेल्या मुलीसोबतचं नवं आयुष्य तिला आता शांततेत व्यतीत करायचंय. साराचं काय होणार? भूतकाळातल्या भयंकर जखमा मनावर वागवणारी स्मोकी आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करेल? खुन्याचे इरादे यशस्वी होतील की स्मोकी आणि तिच्या टीमचे प्रयत्न? जीवन-मरण, आशा-निराशा… मानवी-पाशवी या वृत्तींमधला संघर्ष पानापानांवर मांडणारी, एक संवेदनशील थ्रिलर स्टोरी.
Description
A YOUNG WOMAN LOSES HER FAMILY, HER FRIENDS, ALMOST ANYONE WHO HAS EVER EVEN DONE HER A KINDNESS TO A MANIACAL SERIAL KILLER. IT\`S AS IF EVERY TRACE OF HUMAN CONTACT IS BEING WIPED OUT OF HER LIFE. HER TERRIFYING CASE IS HANDED TO A WOMAN WHO HAS HAD SO MUCH OF HER OWN HAPPINESS SNATCHED AWAY FROM HER: SMOKY BARRETT, THE EXTRAORDINARY HEROINE OF MCFADYEN\`S STUNNING DEBUT SHADOW MAN. NOW CARING FOR HER MURDERED FRIEND\`S MUTE DAUGHTER, SMOKY MUST DECIDE WHETHER OR NOT SHE CAN RISE TO ONE MORE FIENDISH CHALLENGE…
Brand
CODY MCFADYEN
Birth Date : 13/02/1968
अमेरिकेतील टेक्सास येथे १ जानेवारी, १९६८मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपली पहिली कादंबरी शॅडो मॅन (२००५) प्रसिद्ध होण्याआधी एक वेबसाइट तयार केली होती. द फेस ऑफ डेथ ही त्यांची दुसरी कादंबरी. मॅकफॅदियेन यांच्या या दोन्ही कादंबऱ्या खूप लोकप्रिय झाल्या आणि त्यांनी जागतिक खपाचे विक्रम प्रस्थापित केले. दक्षिण कॅलिफोर्नियात आपल्या दोन काळ्या, अंधाऱ्या प्रयोगशाळांसह ते राहत आहेत. त्या प्रयोगशाळांचा उल्लेख ते विनाशाच्या काळ्याशक्ती असा करतात.
Reviews
There are no reviews yet.