THE ATTORNEY – द ॲटर्नी
₹350.00
Product Highlights
पॉल माद्रियानी यांच्याकडे जोना हेल आपली निर्वाणीची समस्या घेऊन आला, तेव्हाच पॉलच्या लक्षात आलं, की सॅन डियागोमध्ये शांतपणे आयुष्य घालवायचं आपलं स्वप्न आता दूर ठेवावं लागणार आहे. मादक द्रव्याची चटक लागलेल्या जोनाच्या मुलीने, तथाकथित स्त्रीवादी झोलांडा स्वेडच्या मदतीने, स्वत:च्या मुलीला जोनाच्या ताब्यातून पळवून नेलं होतं. जोना नातीचा सांभाळ करायला असमर्थ आहे, एवढंच नव्हे तर त्याने नातीवर अत्याचारही केले आहेत, असे आरोप मुलीने केले; हे सांगताना जोनाचा चेहरा संतापाने फुलून गेला होता. नंतर झोलांडाच्या खुनाच्या आरोपावरून पोलिसांनी जोनालाच अटक केली. त्या वृद्ध माणसानं खून केला नसेलच अशी पॉललाही खात्री देता येत नव्हती; नंतर आणखी एक व्यक्ती संशयितांच्या यादीत सामील झाली, तेव्हा निरपराध जोनाला वाचवण्यासाठी पॉलने शर्थीने प्रयत्न सुरू केले…
Description
WHEN JONAH HALE COMES TO PAUL MADRIANI WITH A DESPERATE PROBLEM, PAUL KNOWS HIS DREAM OF A QUITE LIFE IN SAN DIEGO MUST GO ON HOLD. JONAH`S GRANDDAUGHTER AMANDA IS MISSING, SNATCHED BY HER DRUG ADDICT MOTHER WITH THE HELP OF THE CHARISMATIC FEMINIST LEADER ZOLANDA “ZO` SUADE. AMID ALLEGATIONS THAT JONAH ABUSED AMANDA AND IS UNFIT TO HAVE CUSTODY, PAUL WATCHES HIS CLIENT`S ANGER TURN TO RAGE. THEN ZO IS FOUND MURDERED AND THE POLICE IMMEDIATELY ARREST JONAH. EVEN PAUL CAN`T BE CERTAIN THAT THE OLD MAN DIDN`T DO IT. BUT WHEN ANOTHER SUSPECT MOVES INTO THE FRAME, SOMEONE WHO MAY ALSO WANT AMANDA AND HER MOTHER DEAD, PAUL FINDS HIMSELF ON A FRANTIC HUNT TO FIND THEM, AS MUCH TO UNCOVER EVIDENCE AS TO SAVE LIVES.
Brand
STEVE MARTINI
Birth Date : 28/02/1946
स्टीव्ह मार्टिनी यांचा जन्म सॅनफ्रान्सिस्को इथे झाला आणि दक्षिण कॅलिफोर्नियात त्यांचे बालपण गेले. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सांता क्रूझ इथून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी मिळवली. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात केली. त्यांनी लॉस एंजल्समध्ये वृत्तपत्र वार्ताहराचे काम आणि कॅलिफोर्निया स्टेट कॅपिटल मध्ये सॅक्रामेंटो इथे संपर्कतज्ज्ञाचे काम केले. पॅसिफिक विद्यापीठातील मॅकजॉर्ज स्कूल ऑफ लॉ मधून कायद्याची पदवी मिळवण्याआधी ते कायदेविषयक बाबींचे तज्ज्ञ म्हणून काम करत. स्टेट बार ऑफ कॅलिफोर्निया मध्ये त्यांनी कायदेप्रतिनिधी म्हणून काम केले. व्रूÂर अत्याचारांचे बळी ठरलेल्यांसाठी असणाऱ्या समितीत खास सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. ते व्यवस्थापन कायद्यातील न्यायाधीश होते आणि सुनावणीचे पर्यवेक्षक अधिकारी होते. १९८४मध्ये आपल्या प्रतिभेचा उपयोग त्यांनी कादंबरी लिहिण्यासाठी केला. कम्पेलिंग एव्हिडन्स या कादंबरीत अॅटर्नी पॉल माद्रिआनी याचा परिचय वाचकांना करून दिला. ती कादंबरी १९९२मध्ये प्रकाशित करण्यात आली. त्या कादंबरीला विक्रमी मागणी होती. त्या कादंबरीमुळे मार्टिनी वैशिष्ट्यपूर्ण लेखक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले.
Reviews
There are no reviews yet.