TANTRADNYANACHI MULAKSHARE BHAG -1 तंत्रज्ञानाची मुळाक्षरे भाग -1
₹150.00
Product Highlights
माणसाचे निसर्गाशी जन्मत:च अतूट नाते आहे. निसर्गाच्या विविध रूपांचे अनुभव घेत माणूस उत्क्रांत होत गेला. आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाची पाऊलवाट होती. या पाऊलवाटेवरून माणसाने दमदार पावले टाकली आणि स्वत:साठी शेकडो-हजारो साधने कशी निर्माण केली, याबाबतची तपशीलवार व सुबोध शैलीत लिहिलेली माहिती म्हणजे `तंत्रज्ञानाची मुळाक्षरे`.
Brand
KAVITA BHALERAO
Birth Date : 02/11/1959
कविता भालेराव यांनी बी.एस्सी, बी.लिब. या पदव्या संपादन केल्या असून त्या विज्ञानविषयक लेखन करतात, तसेच कोश व सूचिवाङ्मयातील कामे करतात. त्यांची जिज्ञासेतून विज्ञान , मैत्री करू या पर्यावरणाशी , संपूर्ण सामान्य विज्ञान , तंत्रज्ञानाची मुऴाक्षरे , प्राणिसृष्टीतील गुपिते , पेशीबद्ध जीवन: एक निरंतर प्रवास , माझा यंत्रमानव मित्र गोबी , सामान्य आजारावरील सोपे नैसर्गिक उपाय आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी दै. सकाळ , दै. लोकसत्ता ,दै. केसरी आदी वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेसाठी त्यांनी विज्ञानपुस्तिका लिहिल्या आहेत. आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी लेखन केले आहे. त्या सृष्टिज्ञान या विज्ञानविषयक मासिकाच्या कार्यकारी संपादक आहेत. भारतीय समाजविज्ञान कोश , पुणे शहराचा ज्ञानकोश यांसारख्या कोश व सूची यांसाठीही त्यांनी काम केले आहे.
Reviews
There are no reviews yet.