TAN MAN – तन मन
₹80.00
Product Highlights
‘तन-मन’ : आजच्या स्त्रीची बंडखोरी हे नाटक शीर्षकातील शब्दजोडीप्रमाणेच दुपेडी विणीचे आहे. वैयक्तिक नजरेतून एक व्यापक सामाजिक मानसिकतेचा भेदक चेहरा आपल्यासमोर उभा राहतो. नवरा-बायकोच्या वैयक्तिक संबंधांची एक वेगळीच बाजू हे नाटक प्रभावीपणे मांडते. – कमलाकर नाडकर्णी, आपलं महानगर
Brand
RATNAKAR MATKARI
Birth Date : 17/11/1938
Death Date : 17/05/2020
रत्नाकर मतकरी यांची १६ फेब्रुवारी, १९५५ रोजी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून वेडी माणसं ही एकांकिका प्रथम प्रसारित झाली. तेव्हापासून आजपर्यंत, पन्नास वर्षांहून अधिक काळ, त्यांची समृद्ध कारकिर्द बहरतेच आहे. साहित्य, रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट या विविध माध्यमांतून त्यांनी लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार म्हणून काम केले आहे. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललितलेख अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांत त्यांनी दर्जेदार लेखन केले आहे. नाटकांचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य आणि संगीत यांची संकल्पना, वेषभूषा रेखाटन आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपली कामगिरी अत्यंत निष्ठेने बजावली आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी यांच्या मदतीने त्यांनी बालनाट्य,सूत्रधार आणि महाद्वार अशा तीन नाट्यसंस्था सुरू केल्या. प्रयोगशीलता, निर्मितीची अथक ऊर्जा, चैतन्य, उपक्रमशीलता; तसेच अंतर्मुखता आणि समाजाभिमुखता यांचे संतुलन हे रत्नाकर मतकरींच्या कलावंत-व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू आहेत. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, 2019-20
Reviews
There are no reviews yet.