SWAPNACHOURYA – स्वप्नचौर्य
₹190.00
Product Highlights
विज्ञानकथा ही मानवाला भविष्यकाळात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं समाजावर आणि मानवी व्यक्तीगत जीवनावर कोणते परिणाम होऊ शकतील याची पूर्व कल्पना देते. आगामी चित्रपटातील काही दृश्यं दाखवून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना जाणीव करून देणाया ‘ट्रेलर’चाच हा एक प्रकार असतो. त्याच बरोबर विज्ञानकथा काही प्रमाणात आजच्या जीवनावरही भाष्य करीत असते. या सर्व बाबींची चुणूक ‘स्वप्नचौर्य’ मधे वाचकास वाचायला मिळेल.
Description
THE STORIES BASED ON SCIENCE AND INVENTIONS HELP A PERSON TO PEEP INTO THE FUTURE. THEY ALSO ARE A GOOD AID IN UNDERSTANDING THE EFFECTS OF TECHNOLOGY AND INVENTIONS. THEY CREATE A BACKGROUND FOR THOSE WHO ARE INQUISITIVE ABOUT THE NATURE. IN A WAY, THEY RESEMBLE THE ‘TRAILER’ WHICH IS SPECIFICALLY EDITED TO GIVE AN IDEA ABOUT THE FORTHCOMING MOVIE AND ALSO TO CREATE CURIOSITY IN THE MINDS OF THE ONLOOKERS. THE STORIES INCLUDED IN THE ABOVE COLLECTION WILL HELP TO ARISE INTEREST ABOUT THE FUTURE AND WILL ALSO GIVE A GLIMPSE OF THE ADVANTAGES OF INGENUITY.
Brand
NIRANJAN GHATE
Birth Date : 10/01/1946
निरंजन घाटे आणि विज्ञानविषयक भरपूर आणि सोपी माहिती असणारी पुस्तके हे समीकरण वाचकांच्या मनात पक्के झाले आहे. निरंजन घाटे यांनी पुणे विद्यापीठातून भूशास्त्र विभागात उच्च शिक्षण घेतले. १९६८ ते १९७७ या काळात त्यांनी पुणे विद्यापीठात प्रयोगदर्शक आणि व्याख्याता म्हणून काम केले आहे. नोव्हेंबर १९७७ पासून जवळजवळ सहा वर्षे त्यांनी आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून कार्यक्रम अधिकारी या नात्याने सहाशे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचे ते उपसंचालक व नंतर संचालक होते. आता ते पूर्ण वेळ लेखन करतात. सृष्टिज्ञान, बुवा, ज्ञानविकास, किर्लोस्कर यांसारख्या मासिकांचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, मराठी साहित्य परिषद आणि महात्मा फुले वस्तू संग्रहालय यांचे ते आजीव सदस्य आहेत. मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९८५ साली त्यांना उत्कृष्ट विज्ञान प्रसारक म्हणून मानपत्र मिळाले. त्यांनी लिहिलेल्या वसुंधरा, एकविसावं शतक आणि नवे शतक या पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे प्रा.डॉ.मो.वा. चिपळूणकर पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. याशिवाय बालसाहित्य, विज्ञान साहित्य या विभागांत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी लिहिलेले सुमारे ३००० लेख आणि ३०० कथा विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. मराठी व्यतिरिक्त इंग्रजी आणि हिंदी नियतकालिकांमधूनही त्यांनी लेखन केले आहे. मराठी विज्ञानसाहित्याचा इतिहास या विषयातील पथदर्शक तज्ज्ञ म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार
Reviews
There are no reviews yet.