SWAJANIVETUN SWASTHYAPRAPTI – स्वजाणिवेतून स्वास्थ्यप्राप्ती
₹195.00
Product Highlights
विविध जैविक रसायने, संप्रेरके, एन्झाइम, न्युरो-ट्रान्समीटर, इम्युनोग्लोब्यूलीन यांसारख्या शरीराला गरज असणाऱ्या सर्व औषधी घटकांची निर्मिती करणारा कारखाना प्रत्येकाच्या शरीरात जन्मतःच असतो. जेव्हा आपल्या भावनेत, समजुतीत आपण जाणीवपूर्वक बदल करतो, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तेव्हा आजारपण म्हणजे काय याचे नीट आकलन होते. संपूर्ण निरोगीपणाची नैर्सिगक स्थिती कशी आणि का असते, हे समजायला लागते. आपल्या आतला डॉक्टर एकदम भानावर येतो आणि निरोगीपणा व स्वास्थ्याची स्थिती लवकरात लवकर यावी, सुसंवाद साधला जावा म्हणून सर्व सुधारणांना शरीर-मनाच्या पातळीवर ताबडतोब सुरुवात होते. स्वतःमधल्या प्रवासाचा टप्प्याटप्प्यानं अनुभव घेता यावा व स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे संपूर्णपणे परतता यावे, हे ‘कॉन्शसनेस हील्स’ या पुस्तकामागचे प्रयोजन आहे.
Description
CONSCIOUSNESS HEALS TAKES US ON A VOYAGE TO THE VERY BEGINNING, WHERE CONSCIOUSNESS IS THE FUNDAMENTAL SOURCE OF ALL CREATION. IT THEN GOES ON TO TRACE THE ORIGINS OF ILLNESS, AND SHOWS US THAT: * OUR CONSCIOUSNESS IS EXPRESSED THROUGH BODY, MIND AND SOUL. * WHEN BODY, MIND AND SOUL ARE FULLY ALIGNED, WE ARE PLUGGED IN TO AN IMMENSE SOURCE OF POWER WITH LIMITLESS POTENTIAL. THIS IS OUR NATURAL STATE, A STATE OF `EASE`, WHICH LEADS TO PERFECT HEALTH. * WHEN BODY, MIND AND SOUL ARE NOT FULLY ALIGNED, WE HAVE ONLY LIMITED ACCESS TO OUR POWER AND POTENTIAL. THIS IS A STATE OF `DISEASE`, WHICH LEADS TO ILLNESS.
Brand
DR. NEWTON KONDAVETI
डॉ. न्यूटन कोन्दाविती यांनी भारतात आंध्र प्रदेशातील कुर्नुल वैद्यकीय महाविद्यालयात पदवीपूर्व शिक्षण घेतले. त्यानंतर निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथून पदव्युत्तर शिक्षण घेतले. ‘पास्ट लाइफ रिग्रेशन थेरपी’ या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय बाजूला ठेवला आहे. याशिवाय मेटाफिजिक्स आणि अध्यात्म विज्ञान (ाQस्परिच्युअल सायन्स) या विषयाचे ते प्राध्यापक आहेत. आपली सखी- सहचरी डॉ. लक्ष्मी यांच्या समवेत जगभर प्रवास करून ते अनेक वर्कशॉप आणि सेमिनार घेत असतात. ‘पास्ट लाइफ रिग्रेशन थेरपी’च्या क्षेत्रात स्वतःला झोकून दिलेल्या डॉ. न्यूटन यांच्या अथक परिश्रमांमुळे हजारो लोकांना आपल्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळाली आहे आणि स्वास्थ्यप्राप्तीसाठी त्याचा मोठा फायदाही झाला आहे.
Reviews
There are no reviews yet.