SUNDAR MAN – सुंदर मन
₹170.00
Product Highlights
आपण स्वत:ला आकर्षक करण्यासाठी कपड्यांवर, सौंदर्यप्रसाधनांवर, आहारावर, व्यायामावर अमाप पैसा खर्च करतो. पण सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या, बिनखर्चाच्या एका गोष्टीकडे मात्र आपण साफ दुर्लक्ष करतो. ते घडवायला फारसा वेळही लागत नाही. ते आहे सुंदर मन. मन घडवायला ढीगभर ज्ञानाची गरज नाही किंवा उत्तम व्यक्तिमत्त्वाचाहीR गरज नाही. फक्त तुमच्यापाशी सर्जनशीलता, कल्पकता व स्पष्टपणा असला म्हणजे झालं. लोकांची विचारप्रक्रिया बदलू शकणारे जगप्रसिद्ध, EDWARD DE BONO यांनी आपल्या संभाषणकौशल्यांनी लोकांना कसं प्रभावित करायचं ते सरळसोप्या भाषेत पुस्तकात मांडलं आहे. हे पुस्तक वाचून संपेपर्यंत तुमचं आयुष्य कसं बदलून गेलं आहे, हे तुमच्या लक्षातही येणार नाही.
Description
PEOPLE SPEND A FORTUNE ON THEIR BODIES, THEIR FACES, THEIR HAIR, THEIR CLOTHES. COSMETICS, PLASTIC SURGERY, DIETS, GYM MEMBERSHIP – EVERYONE`S TRYING TO BE MORE ATTRACTIVE. BUT THERE`S AN EASIER WAY TO BECOME A BEAUTIFUL PERSON. IT DOESN`T HAVE TO BE PHYSICAL. NO MATTER HOW YOU LOOK, IF YOU HAVE A MIND THAT`S FASCINATING, CREATIVE, EXCITING – IF YOU`RE A GOOD THINKER – YOU CAN BE BEAUTIFUL. AND BEING ATTRACTIVE DOESN`T NECESSARILY COME FROM BEING INTELLIGENT OR HIGHLY-EDUCATED. IT ISN`T ABOUT HAVING A GREAT PERSONALITY. IT`S ABOUT USING YOUR IMAGINATION AND EXPANDING YOUR CREATIVITY. AND IT`S WHEN TALKING WITH PEOPLE THAT WE MAKE THE GREATEST IMPACT. A PERSON MAY BE PHYSICALLY BEAUTIFUL, BUT WHEN SPEAKING TO OTHERS A DULL OR UGLY OR UNCREATIVE MIND WILL DEFINITELY TURN THEM OFF. IN CLEAR, PRACTICAL LANGUAGE, DE BONO SHOWS HOW BY APPLYING LATERAL AND PARALLEL THINKING SKILLS TO YOUR CONVERSATION YOU CAN IMPROVE YOUR MIND. BY LEARNING HOW TO LISTEN, MAKE A POINT, AND MANOEUVRE A DISCUSSION, YOU CAN BECOME CREATIVE AND MORE APPEALING – MORE BEAUTIFUL.
Brand
EDWARD DE BONO
सर्जनशील विचार सरळ सोप्या रीतीने करण्याचे कौशल्य शिकवणारे एडवर्ड डी बोनो हे आघाडीचे मान्यताप्राप्त विचारवंत आहेत. हजारो लोक संगणकासाठी प्रणाली लिहीत असताना एडवर्ड डी बोनो मानवी मनासाठी ती प्रणाली लिहीत आहेत. मानवी मन म्हणजे स्व-नियोजित माहिती प्रणाली आहे, या संकल्पनेची जाणीव ठेवून त्यांनी काही समांतर विचारपद्धतीची सूत्रे विकसित केलेली आहेत. त्यांची आकलनात्मक विचारपद्धतीची सूत्रं (CORT & DATT) शाळांतून व उद्योगधंद्यांतून सर्रासपणे उपयोगात आणली जातात. आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, प्रुडेंशिअल, एनटीटी (जपान), नोकिया (फिनलंड) व सिमेन्स (जर्मनी) यांसारख्या नामवंत उद्योगसमूहांतून बोनो यांच्या विचारपद्धतींना प्रतिसाद मिळाला आहे. जगाच्या इतिहासात, आत्तापर्यंत मानवतेवर प्रभाव पाडणाऱ्या २५० नावांच्या यादीत, दक्षिण आफ्रिकेतल्या विचारवंतांनी डॉ. बोनो यांचे नाव समाविष्ट केले आहे. अॅक्सेंच्युअर या सुप्रसिद्ध सल्ला देणाऱ्या उद्योगसमूहाने, ५० प्रभावशाली विचारवंत उद्योजकांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे. त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्यांना व डाउन्स सिंड्रोम यंगस्टर्सना विचार पद्धती शिकवलेली आहे. त्यांना ऑक्सफर्ड, केंब्रिज, लंडन आणि हार्वर्ड येथे व्याख्याने देण्यासाठी बोलवत असत व ते ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाचे ऱ्होर्ड्स स्कॉलर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ६७ पुस्तके लिहिलेली असून त्यांचे ३७ भाषांतून अनुवाद झाले आहेत.
Reviews
There are no reviews yet.