STATE OF FEAR – स्टेट ऑफ फिअर
₹400.00
Product Highlights
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड वायू वाढून पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्यामुळे बर्फ वितळून सागरांची पातळी वाढणार. पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे महापूर, चक्रीवादळं, दुष्काळ, ढगफुटी अशी संकटं वाढू लागली आहेत. हे सारे जगाला पटवण्यासाठी एन.ई.आर.एफ. या पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थेनं कॅलिफोर्नियात एक जागतिक परिषद आयोजित केलेली आहे. एन.ई.आर.एफ.कडे निधीची कमतरता आहे. संकटांचा धोका किती मोठा आहे हे पटवण्यासाठी पर्यावरणवादाचे समर्थक दहशतवादी पॅसेफिक महासागरात पाण्याखाली स्फोट घडवून आणतात. तिथे निर्माण झालेली सुनामीची लाट ताशी आठशे किलोमीटर वेगानं कॅलिफोर्नियाच्या दिशेनं सरकू लागली आहे…
Description
EVERYONE IS AWARE THAT THE INCREASE IN THE INDUSTRIALIZATION IS LEADING TO THE INCREASED PERCENTAGE OF CARBON DIOXIDE IN THE ATMOSPHERE, WHICH IS FURTHER INCREASING THE GLOBAL TEMPERATURE. THIS INCREASED TEMPERATURE IS FURTHER GOING TO RESULT INTO THE INCREASED WATER LEVELS ALL OVER THE WORLD, MELTING THE SNOW EVERYWHERE. IT IS CALLING IN FOR NATURAL CALAMITIES LIKE FLOOD, STORMS, FAMINE, CLOUD BURSTING, ETC. NERF, A CHARITABLE ORGANIZATION WORKING FOR THE BETTERMENT OF THE ENVIRONMENT; HAS CALLED FOR A WORLDWIDE MEETING AT CALIFORNIA; THEY ARE LACKING IN FUNDS. THERE ARE OTHER ENVIRONMENTALISTS, BELIEVING IN THE TERRORISTS` WAY OF WORKING; THEY BRING IN BOMB EXPLOSIONS UNDER WATER, IN THE PACIFIC OCEAN, RESULTING INTO TSUNAMI, WHICH STARTS TOWARDS THE COASTS OF CALIFORNIA AT THE SPEED OF 800 KM PER HOUR…..
Brand
MICHAEL CRICHTON
Birth Date : 23/10/1942
Death Date : 04/11/2008
मायकेल क्रायटन यांची वीस कोटींपेक्षा जास्त पुस्तके खपली असून त्यांच्या पुस्तकांचे जगभरात ३६ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या १३ पुस्तकांवर चित्रपट निघाले आहेत. त्यांच्या द अन्ड्रोमिडा स्ट्रेन, ज्युरासिक पार्क, नेक्स्ट, टाइम लाइन, डिस्क्लोजर, प्रे, स्टेट ऑफ फिअर आणि पायरेट लॅटिट्यूड्स या कादंबऱ्यांनी लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले आहेत. एकाच वेळी पुस्तक, चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रम हे सर्वोच्च स्थानी असण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सन २००८ मध्ये मायकेल क्रायटन यांचा मृत्यू झाला, त्यावेळी मायक्रो ही कादंबरी जवळजवळ पूर्ण झाली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ती रिचर्ड प्रेस्टन यांनी पूर्ण केली. विज्ञानावर आधारलेल्या थरारक व रहस्यमय कथानकांनी वाचकांना खिळवून टाकणाऱ्या मायकेल क्रायटन यांना अफाट लोकप्रियता लाभली. हार्वर्ड विद्यापीठातून एम.डी. पदवी घेतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. जॉन लांग आणि मायकेल डग्लस या टोपणनावांनी दहा कादंबऱ्या लिहिल्यानंतर १९६९मध्ये आलेली द अन्ड्रोमीडा स्ट्रेन ही पहिलीच कादंबरी खळबळजनक ठरली.
Reviews
There are no reviews yet.