SNEHADHARA – स्नेहधारा
₹160.00
Product Highlights
कै. रणजित देसाई यांच्या दैवी प्रतिभेचा हा प्रसन्न; परंतु अखेरचा ललिताविष्कार : स्नेहधारा ! दैव, व्यक्तित्व आणि परिस्थिती या तिन्हीच्या क्रियाप्रतिक्रियांमधून जीवन घडलं जात असताना ज्या ज्या छोट्यामोठ्या व्यक्तीशी त्यांचा ऋणानुबंध जडला, त्या सर्वांच कृतज्ञ स्मरण श्री. रणजित देसाई यांनी आपल्या या अखेरच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहात केलं आहे. हे सलग आत्मकथन नव्हे. काही तरी तात्कालिक निमित्त्त घडलं आणि त्या त्या व्यक्तीचं स्मरण उत्कटतेनं झालं. त्या व्यक्तीशी संबंधित प्रसंगांची आणि व्यक्तीचं हे हळुवार लेखणीनं केलेलं भावचित्रण आहे. या व्यक्तिरेखाही तशा समग्र, परिपूर्ण नाहीत. त्या व्यक्तीशी आलेला श्री. देसार्इंचा संबंध आणि त्या संबंधाची प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या मनावर उमटलेला चिरकालिक स्वरूपाचा संस्कार यांनाच या छोट्या स्मरणसाखळीत प्राधान्य दिलं गेलं आहे. कै. रणजित देसार्इंच्या वाचकांच्या हाती त्यांची ही अखेरची ललितकृती देताना आम्हांला दु:खमिश्रित आनंद होत आहे. दु:ख अशासाठी, की श्री. देसार्इंचं हे अखेरचं अप्रकाशित असं साहित्य आम्ही ग्रंथरूपानं प्रसिद्ध करीत आहोत…
Description
SNEHDHARA: THE FINAL, PLEASANT MANIFESTATION OF THE DIVINE TALENT OF THE LATE RANJIT DESAI! A PERSON’S LIFE IS SHAPED BY HIS FATE, HIS CHARACTER AND HIS CIRCUMSTANCE. IN THIS COLLECTION OF CHARACTERSKETCHES – HIS LAST SUCH WORK – RANJIT DESAI GRATEFULLY REMINISCES ABOUT THE DIFFERENT HUMAN BEINGS ­– SIMPLE BEINGS AS WELL AS GREAT ONES – THAT TOUCHED HIS LIFE AND WITH WHOM HE DEVELOPED SOME SORT OF BOND. THIS IS NOT A CONTINUOUS AUTOBIOGRAPHY. AS IT HAPPENED, DIFFERENT MINOR OCCASIONS HAVE SERVED TO TRIGGER RECOLLECTION OF INTENSE MEMORIES OF CERTAIN PEOPLE. THIS IS AN EMOTIONAL RECOLLECTION OF EACH SUCH INDIVIDUAL AND THE EVENTS ASSOCIATED WITH HIM, WRITTEN BY A SENSITIVE PEN. THE CHARACTERS DESCRIBED HERE ARE NOT ‘COMPLETE’ BEINGS. THESE MEMOIRS AND SKETCHES TELL US ABOUT THE ENCOUNTERS DESAI HAD WITH EACH OF THESE INDIVIDUALS AND THE WAY THESE ENCOUNTERS MADE A LASTING IMPRESSION ON HIM. OUR JOY AT PRESENTING THIS COLLECTION WRITTEN BY THE LATE RANJIT DESAI TO THE READER IS TINGED WITH SADNESS…BECAUSE THIS IS THE LAST OF HIS UNPUBLISHED WORK THAT WE ARE PRESENTING IN BOOK FORM…
Brand
RANJEET DESAI
Birth Date : 08/04/1928
Death Date : 06/03/1992
उमद्या, दिलदार मनाचा एक थोर साहित्यिक. रणजित देसार्इंचे साहित्य म्हणजे वाचकांशी उच्च भावनिक स्तरावर साधलेला कलात्मक संवाद. महाराष्ट्रातील या थोर, सर्जनशील, प्रतिभावान साहित्यिकाचा जन्म कोल्हापुरातील कोवाड येथील एका संपन्न खानदानी कुटुंबात झाला. शिक्षणानंतर कोवाडला स्थायिक झाल्यावर तिथल्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी लेखन-वाचन हा छंद जोपासला. १९४६ मध्ये प्रसाद या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या भैरव या पहिल्याच कथेला पारितोषिक मिळाले. १९५८ साली त्यांचा रूपमहाल हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याच सुमारास बारी ही कादंबरी लिहून त्यांनी कादंबरीक्षेत्रात पहिले पाऊल टाकले. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक या विषयांबरोबरच चरितकहाणी हा कादंबरीचा नवा प्रकार हाताळला आणि आपल्या समर्थ लेखणीने तो लोकप्रियही केला. चरित्रकादंबरीसाठी त्यांनी निवडलेल्या व्यक्ती सर्वसामान्य वर्गात न बसणाऱ्या, असामान्य कर्तृत्व असलेल्या आहेत. स्वामी या त्यांच्या कादंबरीला अफाट लोकप्रियता मिळाली. या कादंबरीत त्यांनी थोरले माधवराव पेशवे व त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्यातील कोमल भावबंध लोकांसमोर मांडला. या कादंबरीवर लोकांनी जिवापाड प्रेम केलेच, त्याचबरोबर रणजित देसाई यांना स्वामीकार हा किताबही बहाल केला. कथालेखन करताना देसाई यांनी प्रथमच जाणीवपूर्वक प्राणिकथा लिहिल्या. या कथांमधून निसर्ग, माणूस आणि प्राणी यांचा अतूट संबंध त्यांनी फारच प्रभावीपणे मांडला. स्वामी या एकाच कादंबरीला राज्य पुरस्कार, ह.ना. आपटे पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले. रणजित देसाई यांनी अनेक प्रादेशिक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले. साहित्यक्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री हा किताब बहाल करून सन्मानित केले.
Reviews
There are no reviews yet.