Shivkalin Maharashtra – शिवकालीन महाराष्ट्र
₹250.00
Product Highlights
शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा मानदंड! त्यांच्या पराक्रमाची गाथा अनेक चरित्रकारांनी आजवर गायिलेली आहे आणि पुढेही गातील. न्यायमूर्ती रानडे यांनी ‘मराठी राष्ट्राची
निर्मिती’ ही शिवाजीराजाची थोर देशसेवा असा सिद्धांत मांडला. डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी त्यांच्या प्रशासनाचे आणि लष्करी पद्धतीचे विवेचन केले. परंतु ‘मराठी राज्य’ आर्थिकदृष्ट्या कसे सबल होईल यासाठी शिवरायांनी जे प्रयत्न केले त्याचा आजवर साकल्याने फारसा विचार झाला नाही. ‘शिवकालीन महाराष्ट्र’ या ग्रंथात, समकालीन साधनांच्या साहाय्याने १७ व्या शतकातील आर्थिक जीवनाचा विचार प्रथमच इतक्या विस्तृतपणे मांडला आहे. मराठ्यांचे राज्य म्हणजे लुटारूंचे राज्य अथवा लष्करी राजवट अथवा सरंजामशाही नसून ते ‘बहुत जनांसी आधारू’ असे लोकांचे राज्य होते, त्या राज्याच्या राजमुद्रेत ‘भद्राय राजते’ अशी अक्षरे होता, आणि ‘धाकुटपणापासून माणसाचे माणस वळखतात’ असे अभिमानाने म्हणणा-या ‘स्वामी’ने निर्माण केलेले ते ‘कल्याणकारी’ राज्य होते त्याचा विस्तार छोटासा असला तरी ‘आर्थिकदृष्ट्या’ त्याला स्थैर्य येण्यासाठी शिवरायांनी केलेल्या प्रयत्नांचे येथे विवेचन केले आहे आणि हेच या ग्रंथाचे आगळे-वेगळेपण आहे.
Brand
अ. रा. कुलकर्णी

Reviews
There are no reviews yet.