SHELKA SAJ – शेलका साज
₹195.00
Product Highlights
हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! इथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लपंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार वंगोऱ्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता – असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याचा वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना ‘आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल. सावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. ‘मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल – यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज!!
Description
THIS IS A COLLECTION OF CREATIVE WRITING FROM THE AUTHOR OF THE BEST SELLER, `MRITINJAYA`.
Brand
SHIVAJI SAWANT
Birth Date : 31/08/1940
Death Date : 18/09/2002
एफ.वाय.बी.ए पर्यंत शिक्षण झाल्यावर शिवाजी सावंतांनी वाणिज्य विषयाच्या लघुलिपी आणि टंकलेखन यांचा अभ्याक्रम पूर्ण केला. राजाराम प्रशाला कोल्हापूर या ठिकाणी वीस वर्षे अध्यापनाचे कार्य त्यांनी केले. पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याच्या लोकशिक्षण मासिकामध्ये त्यांनी सहा वर्षे काम केले. महाभारताच्या सखोल अभ्यासातून त्यांनी मृत्युंजय सारखी अजरामर कलाकृती निर्माण केली. इतर अनेक पुरस्कारांसह दिल्लीतील ज्ञानपीठ संस्थेचा मूर्तिदेवी पुरस्कार या कादंबरीला मिळाला. मृत्युंजय हिंदी, गुजराथी, मल्याळम्, बंगाली, राजस्थानी, कन्नडसह इंग्रजीतही भाषांतरित झाली आहे. पुढे त्यांच्या छावा, युगंधर या पुस्तकांनीही अमाप प्रसिद्धी मिळवली. मृत्युंजय व छावा कादंबरीवर आधारित नाटकांचे लेखनही केले. १९८३ मध्ये बडोदा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काही काळ ते कार्यरत होते.
Reviews
There are no reviews yet.