SECOND LADY – सेकंड लेडी
₹250.00
Product Highlights
वास्तव हे कल्पिताहून अद्भूत असू शकतं, याचे दाखले जगात नेहमीच मिळत असतात. एकासारखी एक दिसणारी माणसं दुर्मीळ असतात, परंतु तशी असू शकतात. `क्लोनिंग`च्या आजच्या जमान्यात तर अशा शेकडो व्यक्ती निर्माण करता येतील, इतकी मजल विज्ञानानं गाठलेली आहे. भोवाल संन्याशाचा या शतकातील गाजलेला खटला आपल्याला आठवत असेल. एका फार मोठ्या संस्थानातील गायब झालेल्या गृहस्थ काही वर्षांनी अचानक घरी दाखल होतो. नातलगांना तो संपत्ती लाटण्यासाठी आलेला भोंदू वाटतो. कित्येक वर्ष त्याच्यावर खटला चालू राहतो… वगैरे. पेशवाईच्या काळात पानिपतच्या युद्धानंतर असाच एक तोतया सदाशिवराव भाऊ म्हणून पुण्यात हजार होतो. नाना फडणीसांच्या अक्कलहुशारीनं त्याची लबाडी उघडकीस येते. सेकंड लेडी हे तशीच एक विलक्षण कथा आहे. आपण जिच्याबरोबर संसार करतो, ती आपली पत्नी प्रत्यक्षात `दुसरीच` स्त्री आहे, असं समजलं, तर आपल्याला केवढा जबर धक्का बसेल? पण इथं तर खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या त्या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नाही. त्यांचं कामजीवनही `नेहमीच्या`च परिचित `क्रीडां`प्रमाणे यात्किंचितही संशय न येता सुरळीतपणे चालू राहतं…. अशी ही नाजूक; पण गुंतागुंतीची, मती गुंग करणारी कादंबरी…. सेकंड लेडी!
Description
MANY A TIMES WE COME ACROSS WONDERFUL FACTS OF LIFE WHICH ARE MORE FASCINATING THAN THE FASCINATIONS. TWO PEOPLE RESEMBLING EACH OTHER TOTALLY IS A VERY VERY RARE FACT, BUT IT MAY HAPPEN. TODAY IN THIS WORLD OF CLONING, SCIENCE HAS CREATED SUCH MYSTERIES THAT PRODUCING 100 PEOPLE LOOKING EXACTLY THE SAME IS NO MORE A FASCINATION OR DREAM. YOU MUST BE REMEMBERING THE WELL KNOWN PETITION OF SAINT BHOVAL. HE WAS THE PRINCE OF A STATE AND HAD MYSTERIOUSLY DISAPPEARED FROM HIS STATE. HE REAPPEARED AFTER A FEW YEARS. HIS RELATIVES THOUGHT THAT HE IS AN IMPOSTER, A FRAUD, WHO HAS COME TO CLAIM THE RICHES OF THE PRINCELY STATE. THIS PETITION WAS DRAGGED ALONG FOR A LONG PERIOD OF TIME. DURING THE PESHWAI REIGN, THE IMPOSTER OF SADASHIVRAO HAD REACHED PUNE, BUT NANA PHADNIS`S WITS EXPOSED HIM. THIS STORY OF THE SECOND LADY IS ALSO BASED ON SUCH SITUATION. `SECOND LADY` IS THE STORY OF THE WIFE OF THE PRESIDENT OF U.S.A. TILL THE END, WE DO NOT COME TO KNOW ABOUT THE REAL FIRST LADY. THE PRESIDENT HIMSELF DOES NOT REALIZE THAT HIS REAL WIFE IS CHANGED WITH SOMEONE ELSE. HE DOES NOT COME ACROSS A SINGLE THING WHICH MAY REVEAL THE TRUE IDENTITY OF THE LADY. NOT ONLY HIS SOCIAL LIFE BUT ALSO HIS SEX LIFE GOES ON AS BEFORE, IN THEIR USUAL STYLE. THIS IS A STUNNING NOVEL, WHICH LEAVES THE READERS IN A DILEMMA AT THE END.
Brand
IRVING WALLACE
Birth Date : 19/03/1916
Death Date : 29/06/1990
आयर्विंग वॅलेस यांचा जन्म १९१६मध्ये शिकागो येथे झाला. किशोरावस्थेपासूनच त्यांनी मासिकांसाठी कथा लिहावयास सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धात सेवा बजावल्यानंतर त्यांनी मासिकातील त्यांचे लेखन चालू ठेवले. लवकरच हॉलिवूडमध्ये पटकथालेखनाचे सृजनात्मक काम त्यांना मिळाले. अनेक सिनेमांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. हॉलिवूडमध्ये असमाधानकारक प्राप्ती झाल्याने त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ पुस्तकलेखनाला दिला. आयर्विंग वॅलेस एक सिद्धहस्त लेखक होते. त्यांनी एकूण ३३ पुस्तके लिहिली आणि त्या सर्वांचे ३१ विविध भाषांत अनुवाद झाले. वॅलेस यांच्या द वर्ड , द प्राइझ या आणि अशा अनेक कादंबऱ्यावर आधारित चित्रपट निघाले. जून १९९०मध्ये कॅलिफोर्निया येथे आयर्विंग वॅलेस यांचे निधन झाले.
Reviews
There are no reviews yet.