SCREAM FOR ME – स्क्रीम फॉर मी
₹480.00
Product Highlights
काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आपल्या प्रत्येक लोकप्रिय कादंबरीतून,वाचकांच्या अंगावर काटा उभा करत, आपण सस्पेन्स कादंबरीची सम्राज्ञी आहोत हे करेन रोझ ह्या प्रतिभासंपन्न लेखिकेने आता निर्विवादपणे सिद्ध केले आहे. ‘डाय फॉर मी’ या गाजलेल्या कादंबरीची ही लेखिका आता आणखी एक काळजाचा ठोका चुकवणारे कथानक घेऊन, वाचकांच्या समोर येत आहे. एका छोट्याशा गावात अचानक एक भयप्रद खूनसत्र सुरू होतं. गाव पार हादरून जातं. आपल्या कामात निष्णात असणारा एक धाडसी गुप्तचर अधिकारी आणि एक पिसाट, विकृत खुनी ह्यांची आमने-सामने टक्कर होते. मरणाच्या दारात उभ्या केलेल्या आपल्या सावजाला, तो विकृत खुनी वेडावत म्हणतो, ‘‘तुला जेव्हा वेदना असह्य होतील ना, तेव्हा माझ्या नावाने एक किंकाळी फोड.’’ स्पेशल एजंट डॅनियल व्हार्टानियन हा, तेरा वर्षांपूर्वी घडलेल्या एका खुनाची सहीसही नक्कल करणाऱ्या त्या खुन्याला शोधून काढण्याचा विडा उचलतो. नुकताच मारला गेलेल्या आपल्या कुविख्यात खुनी भावाजवळ सापडलेली काही छायाचित्रं, हाच डॅनियलपाशी एकमेव धागा असतो. खुनी इसमाचा शोध घेण्याच्या त्या विलक्षण प्रवासात, त्याला आपल्याच कुटुंबाच्या काळ्याकुट्ट इतिहासाचे दर्शन घडते आणि त्याचबरोबर मानवी अभद्र मनाच्या गूढडोहाचा तळही सापडतो. ह्याच प्रवासात, अॅलेक्स पॅलन ह्या एका सुंदर परिचारिकेची त्याची भेट होते. तिची कहाणी ऐकून, त्याला आपलाच भूतकाळ आठवतो. विशेष म्हणजे अॅलेक्सचा चेहरा आणि तेरा वर्षांपूर्वी खून झालेल्या त्या मुलीच्या चेहऱ्यात कमालीचे साधम्र्य असते. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ह्या प्रकरणात गुंतलेल्या आहेत. त्या विकृत खुनी इसमांच्या यादीत अॅलेक्सचेही नाव आहे, हे डॅनियलला समजते. दिवसागणिक बळी जाणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढू लागते. आता डॅनियलपाशी फारच थोडा अवधी राहिलेला असतो. त्या क्रूरकर्म्याला लवकरात लवकर शोधणं जितकं महत्त्वाचं असतं तितकं महत्त्वाचं असतं, अॅलेक्सचा जीव वाचवणं. कारण तो आता अॅलेक्सच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो.
Description
FOR HER EXCITING DEBUT IN HARDCOVER, NEW YORK TIMES BESTSELLING AUTHOR KAREN ROSE DELIVERS A HEART-STOPPING SUSPENSE NOVEL THAT PICKS UP WHERE DIE FOR ME LEFT OFF, WITH A DETECTIVE DETERMINED TO TRACK DOWN A BRUTAL MURDERER. SPECIAL AGENT DANIEL VARTANIAN HAS SWORN TO FIND THE PERPETRATOR OF MULTIPLE KILLINGS THAT MIMIC A 13-YEAR-OLD MURDER LINKED TO A COLLECTION OF PHOTOGRAPHS THAT BELONGED TO HIS BROTHER, SIMON, THE RUTHLESS SERIAL KILLER WHO MET HIS DEMISE IN DIE FOR ME. DANIEL IS CERTAIN THAT SOMEONE EVEN MORE DEPRAVED THAN HIS BROTHER COMMITTED THESE CRIMES, AND HE`S DETERMINED TO BRING THE CURRENT MURDERER TO JUSTICE AND SOLVE THE MYSTERIOUS CRIME FROM YEARS AGO. WITH ONLY A HANDFUL OF IMAGES AS A LEAD, DANIEL`S SEARCH WILL LEAD HIM BACK THROUGH THE DARK PAST OF HIS OWN FAMILY, AND INTO THE REALM OF A MIND MORE SINISTER THAN HE COULD EVER IMAGINE. BUT HIS QUEST WILL ALSO DRAW HIM TO ALEX FALLON, A BEAUTIFUL NURSE WHOSE TROUBLED PAST REFLECTS HIS OWN. AS DANIEL BECOMES ATTACHED TO ALEX, HE DISCOVERS THAT SHE IS ALSO THE OBJECT OF THE OBSESSED MURDERER. SOON, HE WILL NOT ONLY BE RACING TO DISCOVER THE IDENTITY OF THIS MACABRE CRIMINAL, BUT ALSO TO SAVE THE LIFE OF THE WOMAN HE HAS BEGUN TO LOVE.
Brand
KAREN ROSE
Birth Date : 29/07/1964
जगभरातील वाचकांच्या पसंतीस उतरलेली व रिटा या सन्माननीय पारितोषिकाची विजेती करेन रोझ हिचा जन्म, बालपण व शिक्षण वॉशिंग्टन डी.सी. नजीकच्या मेरीलँड या शहरात झाले. जुलै, २००३ मध्ये डोंट टेल मी ही तिची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर आतापर्यंत तिची एक दीर्घकथा व दहा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आय अॅम वॉचिंग यू या तिच्या तिसऱ्या कादंबरीसाठी तिला २००५ सालाचे सर्वोत्कृष्ट रहस्यमय लेखीकेचे रिटा पारितोषिक मिळाले. कोणत्याही कथेचा शेवट हा नेहमी सुखद असावा असे माझे मत आहे. करेन म्हणते, आणि मला वाटते की वाचकांनाही असाच शेवट आवडतो. खऱ्या आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात की जगणे मुश्किल होऊन जाते. अशा वेळेस वाटते की हळुच अशा एका प्रदेशात निघून जावे की जिथे अखेरच्या वळणावर गुलाबांचे ताटवे पसरलेले असतील. मला आशा आहे की माझ्या कथा, माझ्या वाचकांनाही अशीच एक हवीहवीशी वाटणारी सुरेख वाट मिळवून देतील.
Reviews
There are no reviews yet.