SAVALI UNHACHI – सावली उन्हाची
₹70.00
Product Highlights
‘…ही लग्नगाठ दोन पोलादी पट्ट्यांना केलेल्या वेल्डिंगसारखी असते. ते दोन जीव अधिक सामथ्र्यवान बनतात, ते त्या वेल्डिंगमुळं. जीवन कुणासाठी थांबत नाही. ते पुढं जातच असतं. मुलंबाळं वाढतात. जुन्यांची सोबत हरवते. अनेक सुखदु:खाचे क्षण येतात. हे सारे बदल घडत असताना तुम्ही मात्र एकत्र असता. त्या एकत्रपणाचा आनंद उपभोगत असता. ख-या अर्थानं पृथ्वीवरचा स्वर्ग तिथंच अवतरतो. ती एकरूपता आली, की जगात हवे तेवढे उत्पात होऊ देत, संघर्ष वाढू देत, संसार अबाधितच राहतो. राखेतून जन्म घेणाया फिनिक्स पक्ष्यासारखा. ती ताकद तुम्ही मिळवलीत, की तुम्ही कुणालाही दुर्लक्षू शकता. निंदेला हसू शकता. जोवर तुमच्या पाठीशी कुणीतरी खंबीरपणे उभं आहे, याची खात्री असेल, तोवर कशालाही भिण्याची गरज नाही, कळलं?’
Description
THE BOND OF WEDLOCK IS LIKE THE WELDING THAT BINDS TWO PLATES OF STEEL TOGETHER. AS A RESULT, TWO BEINGS BECOME STRONGER. LIFE GOES ON RELENTLESSLY. IT DOES NOT PAUSE FOR ANYBODY. CHILDREN GROW UP. WE LOSE THE COMPANY OF OUR FRIENDS; WE EXPERIENCE TIMES OF HAPPINESS AS WELL AS SORROW. BUT THROUGH ALL THESE UPHEAVALS THE COUPLE IS ALWAYS WITH EACH OTHER, ENJOYING THE PLEASURES OF THIS BOND. IT IS HERE THAT WE CAN EXPERIENCE HEAVEN ON EARTH. WHEREVER THERE IS SUCH ONENESS, WEDDED LIFE REMAINS UNSCATHED DESPITE THE CONFLICTS OR UPHEAVALS IN THE WORLD AT LARGE, JUST LIKE THE PHOENIX THAT RISES FROM THE ASHES. IF YOU CAN ACQUIRE THIS STRENGTH, YOU CAN LET THE WORLD BE. YOU CAN SMILE AT CRITICISMS. AS LONG AS YOU ARE SURE THAT THERE IS SOMEONE FIRMLY BACKING YOU, THERE IS NO REASON TO FEAR ANYTHING, UNDERSTAND?’
Brand
RANJEET DESAI
Birth Date : 08/04/1928
Death Date : 06/03/1992
उमद्या, दिलदार मनाचा एक थोर साहित्यिक. रणजित देसार्इंचे साहित्य म्हणजे वाचकांशी उच्च भावनिक स्तरावर साधलेला कलात्मक संवाद. महाराष्ट्रातील या थोर, सर्जनशील, प्रतिभावान साहित्यिकाचा जन्म कोल्हापुरातील कोवाड येथील एका संपन्न खानदानी कुटुंबात झाला. शिक्षणानंतर कोवाडला स्थायिक झाल्यावर तिथल्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी लेखन-वाचन हा छंद जोपासला. १९४६ मध्ये प्रसाद या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या भैरव या पहिल्याच कथेला पारितोषिक मिळाले. १९५८ साली त्यांचा रूपमहाल हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याच सुमारास बारी ही कादंबरी लिहून त्यांनी कादंबरीक्षेत्रात पहिले पाऊल टाकले. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक या विषयांबरोबरच चरितकहाणी हा कादंबरीचा नवा प्रकार हाताळला आणि आपल्या समर्थ लेखणीने तो लोकप्रियही केला. चरित्रकादंबरीसाठी त्यांनी निवडलेल्या व्यक्ती सर्वसामान्य वर्गात न बसणाऱ्या, असामान्य कर्तृत्व असलेल्या आहेत. स्वामी या त्यांच्या कादंबरीला अफाट लोकप्रियता मिळाली. या कादंबरीत त्यांनी थोरले माधवराव पेशवे व त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्यातील कोमल भावबंध लोकांसमोर मांडला. या कादंबरीवर लोकांनी जिवापाड प्रेम केलेच, त्याचबरोबर रणजित देसाई यांना स्वामीकार हा किताबही बहाल केला. कथालेखन करताना देसाई यांनी प्रथमच जाणीवपूर्वक प्राणिकथा लिहिल्या. या कथांमधून निसर्ग, माणूस आणि प्राणी यांचा अतूट संबंध त्यांनी फारच प्रभावीपणे मांडला. स्वामी या एकाच कादंबरीला राज्य पुरस्कार, ह.ना. आपटे पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले. रणजित देसाई यांनी अनेक प्रादेशिक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले. साहित्यक्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री हा किताब बहाल करून सन्मानित केले.
Reviews
There are no reviews yet.