SANGEET TANSEN – संगीत तानसेन
₹70.00
Product Highlights
‘गाणं हे पौर्णिमेच्या रात्रीसारखं असतं, बिलास. जो राग आळवला जातो, तो त्या रात्रीचा चंद्र असतो. अशा वेळी निस्तेज तारे दिसूही शकत नाहीत. जे ठळक तारे आहेत, त्यांच्याच सोबतीनं चंद्र प्रवास करीत असतो. बाकीचे सारे तारे चंद्राच्या प्रकाशात लुप्त होतात. ज्यांची चंद्राला साथ करण्याची कुवत असते, तेवढेच फक्त दिसतात. जो राग आपण गातो, त्याचंही असंच आहे. वादीसंवादी तेवढेच स्वर आपण पाहायला हवेत. तरच तो राग खुलतो.’ …गुलशन, अब्बाजानसारखा गुरू मिळणं कठीण! त्यांनी नुसता आकार लावला, तरी कान तृप्त होतात. संगीतसम्राट तानसेन यांची मैफल सजवणारं नाटक!
Description
A RECITAL IS LIKE THE FULL-MOON NIGHT, BILAS. THE RAGA THAT IS RENDERED IS THE MOON OF THAT NIGHT. AT SUCH TIMES, THE DULLER STARS CANNOT EVEN BE SEEN. ONLY THE BRIGHT ONES ARE THE MOON’S CONSORTS. THE REST DISAPPEAR IN THE MOONLIGHT. WE SEE ONLY THOSE STARS THAT HAVE THE CAPABILITY TO ACCOMPANY THE MOON. IT IS THE SAME WITH THE RAGA THAT WE SING. WE MUST LOOK ONLY AT THE VAADI AND SAMVAADI NOTES. ONLY THEN DOES THE RAGA BLOSSOM’. …GULSHAN, IT IS INDEED DIFFICULT TO FIND A GURU LIKE ABBAJAAN! HIS FIRST NOTES ARE ENOUGH TO BRING CONTENTMENT TO ONE’S EARS! A PLAY THAT PAYS TRIBUTE TO THE RECITALS OF TAANSEN – THE VOCALIST PAR EXCELLENCE.
Brand
RANJEET DESAI
Birth Date : 08/04/1928
Death Date : 06/03/1992
उमद्या, दिलदार मनाचा एक थोर साहित्यिक. रणजित देसार्इंचे साहित्य म्हणजे वाचकांशी उच्च भावनिक स्तरावर साधलेला कलात्मक संवाद. महाराष्ट्रातील या थोर, सर्जनशील, प्रतिभावान साहित्यिकाचा जन्म कोल्हापुरातील कोवाड येथील एका संपन्न खानदानी कुटुंबात झाला. शिक्षणानंतर कोवाडला स्थायिक झाल्यावर तिथल्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी लेखन-वाचन हा छंद जोपासला. १९४६ मध्ये प्रसाद या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या भैरव या पहिल्याच कथेला पारितोषिक मिळाले. १९५८ साली त्यांचा रूपमहाल हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याच सुमारास बारी ही कादंबरी लिहून त्यांनी कादंबरीक्षेत्रात पहिले पाऊल टाकले. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक या विषयांबरोबरच चरितकहाणी हा कादंबरीचा नवा प्रकार हाताळला आणि आपल्या समर्थ लेखणीने तो लोकप्रियही केला. चरित्रकादंबरीसाठी त्यांनी निवडलेल्या व्यक्ती सर्वसामान्य वर्गात न बसणाऱ्या, असामान्य कर्तृत्व असलेल्या आहेत. स्वामी या त्यांच्या कादंबरीला अफाट लोकप्रियता मिळाली. या कादंबरीत त्यांनी थोरले माधवराव पेशवे व त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्यातील कोमल भावबंध लोकांसमोर मांडला. या कादंबरीवर लोकांनी जिवापाड प्रेम केलेच, त्याचबरोबर रणजित देसाई यांना स्वामीकार हा किताबही बहाल केला. कथालेखन करताना देसाई यांनी प्रथमच जाणीवपूर्वक प्राणिकथा लिहिल्या. या कथांमधून निसर्ग, माणूस आणि प्राणी यांचा अतूट संबंध त्यांनी फारच प्रभावीपणे मांडला. स्वामी या एकाच कादंबरीला राज्य पुरस्कार, ह.ना. आपटे पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले. रणजित देसाई यांनी अनेक प्रादेशिक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले. साहित्यक्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री हा किताब बहाल करून सन्मानित केले.

Reviews
There are no reviews yet.