SAMIDHA – समिधा
₹150.00
Product Highlights
एका शहरात हरिजनवाडा जाळला गेला. त्यात दोन माणसं मृत्युमुखी पडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना अनेक गावांमधून घडत गेल्या. ही घटना लेखक रणजित देसाई यांच्या मनाला व्यथित करून गेली. त्यांनी गावोगाव फिरून अशा घडलेल्या घटनांचे तपशील मिळवले आणि त्यातून साकार झाली ’समिधा’… सामाजिक विषमता, जातिवाद यांनी समाज पोखरून टाकला आहे. अनेक निष्पापांचे जीवन यातून उद्ध्वस्त झाले आहे. अशा उद्ध्वस्त मनांची व्यथा मांडणारी कादंबरी ’समिधा.’
Description
THIS NOVEL REALISTICALLY PRESENTS THE CURRENT PROBLEMS OF RURAL UNTOUCHABLES. ON ONE HAND ONE MEETS DEVA MAHAR- A RESPRESENTATIVE OF THE LAST GENERATION WHICH NATURALLY ACCEPTED AND SUFFERED THEIR DESPICABLE POSITION IN THE SOCIETY AND ON THE OTHER TUKAR.
Brand
RANJEET DESAI
Birth Date : 08/04/1928
Death Date : 06/03/1992
उमद्या, दिलदार मनाचा एक थोर साहित्यिक. रणजित देसार्इंचे साहित्य म्हणजे वाचकांशी उच्च भावनिक स्तरावर साधलेला कलात्मक संवाद. महाराष्ट्रातील या थोर, सर्जनशील, प्रतिभावान साहित्यिकाचा जन्म कोल्हापुरातील कोवाड येथील एका संपन्न खानदानी कुटुंबात झाला. शिक्षणानंतर कोवाडला स्थायिक झाल्यावर तिथल्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी लेखन-वाचन हा छंद जोपासला. १९४६ मध्ये प्रसाद या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या भैरव या पहिल्याच कथेला पारितोषिक मिळाले. १९५८ साली त्यांचा रूपमहाल हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याच सुमारास बारी ही कादंबरी लिहून त्यांनी कादंबरीक्षेत्रात पहिले पाऊल टाकले. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक या विषयांबरोबरच चरितकहाणी हा कादंबरीचा नवा प्रकार हाताळला आणि आपल्या समर्थ लेखणीने तो लोकप्रियही केला. चरित्रकादंबरीसाठी त्यांनी निवडलेल्या व्यक्ती सर्वसामान्य वर्गात न बसणाऱ्या, असामान्य कर्तृत्व असलेल्या आहेत. स्वामी या त्यांच्या कादंबरीला अफाट लोकप्रियता मिळाली. या कादंबरीत त्यांनी थोरले माधवराव पेशवे व त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्यातील कोमल भावबंध लोकांसमोर मांडला. या कादंबरीवर लोकांनी जिवापाड प्रेम केलेच, त्याचबरोबर रणजित देसाई यांना स्वामीकार हा किताबही बहाल केला. कथालेखन करताना देसाई यांनी प्रथमच जाणीवपूर्वक प्राणिकथा लिहिल्या. या कथांमधून निसर्ग, माणूस आणि प्राणी यांचा अतूट संबंध त्यांनी फारच प्रभावीपणे मांडला. स्वामी या एकाच कादंबरीला राज्य पुरस्कार, ह.ना. आपटे पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले. रणजित देसाई यांनी अनेक प्रादेशिक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले. साहित्यक्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री हा किताब बहाल करून सन्मानित केले.
Reviews
There are no reviews yet.