Samayak Vikas – सम्यक विकास
₹140.00
Product Highlights
विकास’ ही संकल्पना सध्या केवळ ‘भौतिकवाढी’त अडकूनबसली आहे _ संकुचित झाली आहे. दरडोई उपभोग वादरडोई जी.एन्.पी. वाढवणं ह्या झापडबंद रीतीनं ‘विकासा’चा
आलेख चढता ठेवण्याचा सध्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्यामनांवरचं ह्या संकल्पनांचं गारूड इतकं बळकट आहे की, त्यांचेव्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्यांच्यावर होणारे भयंकर दुष्परिणामजाणीवपूर्वक दुर्लक्षून आपण वेगानं त्याच दिशेत पुढे जातआहोत. तिकडे अर्थशास्त्राच्या मोजपट्टया ‘विकास’ होत असल्याचंदाखवतात; पण प्रत्यक्ष अनुभव येत आहे तो सार्वत्रिक अध:पतनाच_ सर्वांगीण विनाशाचा.अशा ह्या अशाश्वत, विनाशक विकासाची कारणमीमांसा करूनख-याखु-या विकासाची दिशा शोधण्याचा हा प्रयत्न. व्यक्ती,
समाज आणि पर्यावरण ह्या तिन्हींची धारणा करणारा; ‘भौतिकवाढी’ला असणा-या निसर्गाच्या अपरिहार्य मर्यादेचं भान ठेवूनत्या मर्यादेचा आदर करणारा; जाणिवेच्या अनंत विस्ताराचा विकासअभिप्रेत असणारा असा हा ‘सम्यक् विकास’ आहे.संकल्पना आणि व्यवहार ह्यांची सांगड घालत त्याचा ऊहापोहकरणारं हे पुस्तक.
Brand
दिलीप कुलकर्णी

Reviews
There are no reviews yet.