Description
SUDHA MURTHY IS FROM THE NORTH KARNATAKA. PEOPLE HERE HAVE A TYPICAL PERSONALITY. THEY ALL CARRY THE CULTURE WITHIN THEMSELVES. ALL THE STORIES COLLECTED HERE RESEMBLE THE JASMINE GARLAND, EACH FLOWER CARRYING THE FRAGRANCE AND INTERWOVEN IN THE KARNATAKI THREAD. THE TENDEREST PART OF THE AUTHOR`S MIND COMES INTO LIGHT THROUGH THE WAY SHE HAS PICTURED THE UNCOMMON ASPECTS OF THE COMMON PEOPLE. SHE HAS ALSO BATHED IT IN LIGHT HUMOUR.
Brand
SUDHA MURTY
Birth Date : 19/08/1950
सुधा मूर्ती यांचा जन्म १९५० साली कर्नाटक राज्यातल्या शिग्गावि येथे झाला. त्यांनी कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम.टेक. ही पदवी प्राप्त केली आहे. पुणे येथे टेल्को कंपनीत निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या स्त्री अभियंता होत्या. त्या विख्यात सामाजिक कार्यकत्र्या आणि कुशल लेखिका आहेत. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. या फाउंडेशनतर्फे करण्यात येणाऱ्या समाजोपयोगी कार्यासाठी त्या विख्यात आहेत. कर्नाटकातल्या सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या चळवळीच्या त्या प्रणेत्या आहेत. १९ नोव्हेंबर, २००४ मध्ये त्यांना समाजकार्याच्या क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल राजलक्ष्मी पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुधा मूर्ती यांना सामाजिक कार्य आणि साहित्यसेवेसाठी सहा डॉक्टरेट्स मिळाल्या आहेत. यापैकी दोन डॉक्टरेट्स महाराष्ट्रातील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातर्फे देण्यात आल्या. कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठाकडून साहित्य क्षेत्रातील कार्यासाठी एक आणि कर्नाटक विद्यापीठाकडून एक अशा दोन डॉक्टरेट्स त्यांना बहाल करण्यात आल्या. तमिळनाडूतील सत्यभामा विद्यापीठाने आणि आंध्रप्रदेशातील श्री पद्मावती विश्वविद्यालयानेही त्यांना डॉक्टरेट्स देऊन सन्मानित केले. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना 2020 सालीच्या 21व्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
Reviews
There are no reviews yet.