SAHITYIK JADAN-GHADAN – साहित्यिक जडण-घडण
₹150.00
Product Highlights
जीवन जगताना माणसाने गतानुगतिक पद्धतीने, सांकेतिक रीतीने जगू नये. जीवनात येणाऱ्या अनुभवांना संवेदनशील वृत्तीने सामोरे जावे. जीवनात अनेक घडामोडी घडत असतात; त्यांचा अनुभव स्वतंत्र वृत्तीने, आपल्या आवडीनिवडीनुसार घ्यावा. असे केले तर जीवनातील एरवी साधे, सरळ, सांकेतिक वाटणारे अनुभवसुद्धा नवनव्या संवेदना, नवनवे जीवनार्थ, नवनवे चिंतन देऊन जातात. परिणामी आपण नेहमीच्या सांकेतिक, सरळ, सोप्या, साध्या जीवनातसुद्धा ‘अनुभवसमृद्ध’ होऊन जातो. याची एकदाची सवय झाली की, आपण तथाकथित चाकोरीतील जीवनातही अनुभवसमृद्ध बनतो… यासाठीच ललित आणि चिंतनशील साहित्याचे वाचन आणि मनन केले पाहिजे. तरच आपले जीवन विविध सौंदर्याने संपन्न होऊ शकेल.
Description
‘HOW DID I REACH THE HEIGHTS? WHILE LIVING LIFE IT IS UNNECESSARY TO GRUMBLE AND COMPLAIN ALL THE WHILE. SO IS LIVING IN THE WORN OUT TRADITIONAL WAY. YOU CAN ALWAYS REACT TO THE SITUATIONS FROM THE BOTTOM OF YOUR HEART. YOU MUST LOOK AT THE THINGS WITH A NEW ASPECT. YOU CAN EVEN LINE THEM WITH YOUR EXPERIENCES, KNOWLEDGE AND THE FEELING OF LIVELINESS. EVERY MOMENT SOMETHING NEW TAKES PLACE IN OUR LIVES. IT MAY BE SIMPLE AT TIMES, BUT YOUR PERSPECTIVE TO LOOK AT THEM MAKES THE EVERYDAY MOMENTS SPECIAL. THEN THESE SIMPLE MOMENTS REVEAL A WONDERFUL ASPECT, AN AMAZING BREAKTHROUGH AND AN ASTONISHING MEANING EVERY TIME. THEY OFFER A NEVER BEFORE DEPTH TO ALL THESE SIMPLE DAYTODAY HAPPENINGS. THE MOMENT YOU REALIZE THE WORTH OF THESE SPLENDID OCCURRENCES YOUR LIFE TAKES A TURN, A SOLID ONE MESMERIZING YOU WITH ITS YET MORE WONDERS. AS YOU SHARE THESE ABUNDANT MOMENTS, YOU ARE FULL OF HOPES AND VIGOUR TO LIVE LIFE ANEW. TO HELP YOU UNDERSTAND THIS PROCESS YOU MUST READ A LOT AND LATER MUST CONTEMPLATE. IT WILL FURTHER ENRICH YOUR LIVES, FILLING IT WITH VARIED FRAGRANCE AND VIVID ANGLES.
Brand
ANAND YADAV
Birth Date : 30/11/1935
Death Date : 27/11/2016
साहित्य अकादमी पुरस्कार, गिरणागौरव पुरस्कार नाशिक, सन्मानित साहित्यिक कालीमाता साहित्य पुरस्कार, परिमल लेखन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, राज्य पुरस्कार, रोहमारे ग्रामीण पुरस्कार, रा. ना. सबनीस वाङ्मय पुरस्कार. आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. ग्रामीण साहित्यविषयक चळवळीला त्यांनी १९७४ पासून प्रारंभ केला. केवळ विनोद निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रामीण पात्रांच्या आयुष्यातील व्यथा, वेदना, त्यांची भीषण सुखदु:ख त्यांनी जगासमोर मांडली. १९८०पासून आजतागायत अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. साहित्यक्षेत्राशी संबंधित अनेक मंडळे, समित्या यांचे ते सदस्य आहेत. त्यांनी हाताळलेल्या अनेक साहित्यप्रकारांत त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे पुरस्कार मिळाले आहेत. आनंद यादव यांच्या अनेक साहित्यकृतींचे हिंदी, बंगाली, उर्दू, कन्नड, इंग्रजी, फ्रेंच या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक येथील मराठी विषय असलेल्या विद्यापीठांतून त्यांच्या पुस्तकांचा साहित्यकृतींचा, अभ्यास सातत्याने केला जातो. तसेच क्रमिक, पाठ्यपुस्तकांतूनही त्यांच्या विविध साहित्यकृतींचा सातत्याने समावेश केला जातो. झोंबी हे त्यांचे आत्मचरित्र खूपच लोकप्रिय झाले आहे. या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार व राज्य पुरस्कार यांच्यासह एकूण आठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Reviews
There are no reviews yet.