SABHET KASE BOLAVE – सभेत कसे बोलावे
₹100.00
Product Highlights
एकदा गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला– मुलांनो, जगामध्ये आई श्रेष्ठ, की गुरू श्रेष्ठ?’ प्रश्न ऐवूÂन सारा वर्ग शांतपणे विचार करू लागला. खरं पाहिलं तर आई श्रेष्ठ. पण प्रश्न विचारणारे आहेत गुरुजी! ते श्रेष्ठ नाहीत कसं म्हणायचं? तेव्हा एक मुलगा उभा राहिला व म्हणाला, ‘गुरुजी मी सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर.’ गुरुजींनी संमती देताच तो मुलगा म्हणाला, ‘गुरुजी श्रेष्ठ!’ हे उत्तर ऐवूÂन गुरुजी खूश झाले. ते प्रसन्न वदनाने त्याला म्हणाले, बाळ, असा पुढं ये! आणि साNया वर्गाला सांग, गुरू का श्रेष्ठ, ते!’ तो मुलगा साNयांपुढं येऊन म्हणाला ‘‘आई अंगाई-गीत गाऊन, आपल्या एकाच बाळाला झोपविते! तर गुरुजी आपल्या एकसुरी आवाजात संपूर्ण वर्गाला झोपवितात!!’’ व्याख्यान वंÂटाळवाणे न होता आकर्षक, खुसखुशीत होण्यासाठी काय करायला हवं ते या पुस्तकात प्रभावीपणे मांडलं आहे. ज्याला भाषणाची भीती वाटते, त्याची भीती नाहीशी करण्याचा कानमंत्रही इथं सांगितलाय. जो आता भाषण करतोय् तो प्रभावी वक्ता होण्यासाठी काय करायला हवं त्याचं मार्गदर्शन इथं आहे. ज्याला भाषण हा प्रकार भीषण आहे; तो आपल्यासाठी नाहीच, असं वाटतंय, त्याला या प्रकाराकडे प्रेमानं आणण्याचं सामथ्र्य या पुस्तकात आहे. आपण हे छोटेखानी पुस्तक एकदा वाचायचं अन् हजारो व्याख्यानं द्यायला तयार व्हायचं. आपल्या व्याख्यानाच्या वेळी श्रोत्यांतून जांभया येणार नाहीत, याची खात्री आहे.
Description
ONCE THE TEACHER ASKED THE STUDENTS A QUESTION- ‘WHO IS THE GREATEST, A MOTHER OR A TEACHER?’ THIS GOT THE WHOLE CLASS THINKING. NO DOUBT THAT MOTHER WAS THE GREATEST. BUT THEN THE QUESTION WAS ASKED BY THE TEACHER. SO HE MAY NOT LIKE THE TRUE ANSWER. HOW COULD THE STUDENTS SAY THAT THE TEACHER WAS NOT THE GREATEST AS AGAINST MOTHER? A BOY STOOD UP AND SAID, ‘SIR, I WILL ANSWER YOUR QUESTION.’ THE TEACHER PERMITTED HIM TO DO SO. THE STUDENT SAID, ‘THE TEACHER IS THE GREATEST.’ THE TEACHER WAS NATURALLY VERY PLEASED TO HEAR THIS. HE ASKED THE STUDENT TO STAND IN FRONT OF THE CLASS AND REPEAT LOUDLY. THE STUDENT CAME FORWARD AND SAID IN A LOUD VOICE; ‘MOTHER SINGS LULLABY AND PUTS HER BABY TO SLEEP WHILE THE TEACHER PUTS THE WHOLE CLASS TO SLEEP WITH HIS MONOTONOUS VOICE.’ THIS BOOK SHOWS US THE VARIOUS WAYS TO MAKE OUR TALK INTERESTING RATHER THAN BORING. THERE ARE PEOPLE WHO HAVE STAGE FEAR. THEY ARE UNABLE TO SPEAK IN PUBLIC. THIS BOOK HELPS THEM TO OVERCOME THIS FEAR. THIS BOOK ALSO SHOWS A PATH TO GREAT ORATORY SKILLS TO THOSE WHO ARE ALREADY GOOD ORATORS. IT WILL HELP TO OVERCOME SPEECH ANXIETY. THERE ARE PEOPLE WHO THINK THAT GIVING A SPEECH IS NOT THEIR CUP OF TEA. THIS BOOK WILL SURELY GUIDE THEM WELL ON THIS PARTICULAR PATH. THOUGH A SMALL BOOK, IT WILL HELP ALL TO GET PREPARED FOR FUTURE SPEECHES-THOUSANDS OF THEM-WHICH WILL BE THOROUGHLY ENJOYED BY ALL THE LISTENERS WITHOUT GETTING BORED FOR A SINGLE MOMENT.
Brand
SHYAM BHURKE
Birth Date : 06/11/1946
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चीफ मॅनेजर, रिजनल मॅनेजर, ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य, तीन बँकांवर संचालक म्हणून काम केले. सध्या आझेलटेक प्रा. लि., पुणे आणि अमेरिका येथे संचालक आहेत. अ. भा. सांस्कृतिक संघ, कथाभारती, डीएसके फाउंडेशन या संस्थांवर कार्याध्यक्ष आहेत. पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धक समितीचे सदस्य आहेत. आत्तापर्यंत विविध विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आकाशवाणीवरून नभोनाट्ये सादर झाली. प्रसिद्ध नियतकालिकांमधून अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. नाटकांमधून भूमिकाही केल्या. काही विषयांवर त्यांच्या ध्वनिफितीही प्रकाशित झाल्या आहेत. पत्नी गीता भुर्के यांच्यासह विशेष लेखन व कार्यक्रमही सादर केले. देश-परदेशांत तीन हजारांवर टॉक-शो केले आहेत. योगाभ्यास, मनाची कार्यशाळा, गिर्यारोहण, साहित्य संमेलनांमधून सक्रिय सहभाग.
Reviews
There are no reviews yet.