RAJARSHI SHAHU CHATRAPATI : PATRAVAYAHAR ANI KAYADE – राजर्षी शाहू छत्रपती :पत्र व्यवहार आणि कायदे
₹150.00
Product Highlights
राजर्षी शाहू छत्रपतींच्या समाजक्रांतीच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या कागदपत्रांच्या संग्रहात अनेक महत्त्वाच्या पत्रव्यवहारांचा समावेश आहे. त्यात खुद्द शाहू छत्रपतींनी इतरांस लिहिलेली तसेच इतरांनी महाराजांना लिहिलेली अशी अनेक दुर्मीळ पत्रे समाविष्ट झालेली आहेत. विशेषत: यामधील शाहू-आंबेडकर पत्रव्यवहार तत्कालीन, सामाजिक व राजकीय चळवळींवर प्रकाश टाकणारा आहे. या उभय महापुरुषांत परस्परांविषयी किती जिव्हाळा होता, याचेही दर्शन ही पत्रे घडवितात. याच पत्रव्यवहारांत, शाहू छत्रपतींनी डॉ. बाबासाहेबांना ‘लोकमान्य आंबेडकर’ असे संबोधिले आहे; तर बाबासाहेबांनी छत्रपतींचे वर्णन करताना त्यांना ‘THE PILLAR OF SOCIAL DEMOCRACY IN INDIA’ (भारतातील सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ) असे म्हटले आहे.
Description
THE AVAILABLE PAPERWORK RELATED TO RAJARSHEE SHAHU MAHARAJ’S SOCIAL WORK INCLUDE MANY OF HIS LETTERS. SOME OF THEM ARE WRITTEN BY HIM. THEY ARE VERY RARE AND IN ORIGINAL FORM. THE CORRESPONDENCE BETWEEN HIM AND AMBEDKAR GENUINELY HELPS TO UNDERSTAND THE FORMER STYLE AND SOCIAL AND POLITICAL ASPECTS. THE LETTERS ALLOW US TO UNDERSTAND THE CARING AND SHARING THAT THESE TWO GREAT MEN HAD. SHAHU MAHARAJ CALLS DR. AMBEDKAR AS ‘LOKMANYA AMBEDKAR’ IN ONE OF HIS LETTERS. DR. AMBEDKAR ON THE OTHER HAND CALLS HIM ‘THE PILLAR OF SOCIAL DEMOCRACY IN INDIA.’
Brand
DR.JAYSINGRAO PAWAR
Birth Date : 30/12/1935
डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (सर्वप्रथम) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्याथ्र्यांसाठी २० क्रमिक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला १९६४ मध्ये सुरुवात झाली. या विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एवूÂण २५पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे ४५हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक – सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी १९९२ मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे १२०० पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ २००१मध्ये प्रसिद्ध केला. भारतातील १६ भाषांमध्ये तसेच रशियन, फ्रेंच, इटालियन, जपानी या परकीय भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे. यांपैकी कन्नड, कोकणी, इंग्लिश, जर्मन, उर्दू व तेलुगू, आणि हिंदी भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. गुजराती व रशियन भाषेतील ग्रंथ प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या संस्थेचे संचालक आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास इत्यादी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्लिश) या ग्रंथाचे प्रकाशन करून शाहूचरित्रकार म्हणून पुणे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. पवार यांनी ऐतिहासिक, तसेच इतर अनेक विषयांवरील २५पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. त्यांना इतिहासविषयक संशोधनातील आणि सामाजिक कार्याबद्दल अनेक व्यक्ती व संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Reviews
There are no reviews yet.