RAJARSHI SHAHU CHATRAPATI : EK ABHYAS – राजर्षी शाहू छत्रपती : एक अभ्यास
₹150.00
Product Highlights
तसे पाहिले, तर अगदी सर्वसाधारण माणसाच्या व्यक्तिमत्त्वालाही असंख्य पैलू असतात. मग शाहूंसारख्या क्रियाशील राजाच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू होते, यात आश्चर्य नाही. वसुधा पवार यांनी आपल्या पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकरणांतून या पैलूंचे दर्शन घडविले आहे. अस्पृश्यतानिवारण, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, वसतिगृहांची स्थापना, दुष्काळावर आणि साथीच्या रोगांवर केलेली मात, आरक्षण, मुलींचे शिक्षण, आंतरजातीय विवाहास मान्यता देण्याचा कायदा, फासेपारधी वगैरेंचे पुनर्वसन, जलसंधारण, चहा-कॉफी लागवड इ. प्रकारे सामाजिक जीवनाच्या असंख्य क्षेत्रांमध्ये ‘राजर्षी शाहूंनी’ काळाच्या पुढे पावले टाकली असे दिसते. काळ राजाला घडवतो की राजा काळाला घडवतो, याचे ‘राजा कालस्य कारणम्’ हे प्राचीन काळी देण्यात आलेले उत्तर भारताच्या इतिहासातील ज्या मोजक्या राजांना यथार्थतेने लागू पडते, त्यांमध्ये शाहू महाराजांचे स्थान फार वरचे आहे, यात शंका नाही. वसुधा पवार यांच्या प्रस्तुत पुस्तकातून हे सर्व उत्तम रीतीने व्यक्त झाले आहे.
Description
“RAJARSHEE SHAHU CHHATRAPATI: A STUDY EVEN A LAYMAN’S PERSONA HAS MULTIPLE FACETS TO IT. IT SHOULD NOT REALLY COME AS A SURPRISE TO KNOW THAT RAJARSHEE SHAHU WAS A MULTI-FACETED, VERSATILE PERSON. VASUDHA PAWAR WONDERFULLY DESCRIBES THESE FACETS OF HIS PERSONALITY THROUGH HER BOOK. ABOLISHMENT OF UNTOUCHABILITY, COMPULSORY PRIMARY EDUCATION, SETTING UP OF HOSTELS, THE FIGHT AGAINST DROUGHT AND EPIDEMICS, RESERVATION, GIRL’S EDUCATION, A LAW ALLOWING INTER-CASTE MARRIAGES, REHABILITATION OF THE OUTCASTS, WATER HARVESTING, TEA-COFFEE PLANTATION AND MANY MORE OF HIS SOCIAL INITIATIVES STAND AS A TESTIMONY TO HIS VISION AND HIS FORESIGHTEDNESS. THE AGE-OLD QUESTION “DOES A KING MOLD THE TIME OR DOES THE TIME MOLD THE KING?” REMAINS MOSTLY UNANSWERED BARRING A FEW KINGS; ONE SUCH KING IS RAJARSHEE SHAHU MAHARAJ. VASUDHA PAWAR HAS PORTRAYED THIS VERY APTLY THROUGH HER WRITINGS. “
Brand
VASUDHA PAWAR
सौ. वसुधा पवार यांनी शिवाजी विद्यापीठातून एम. ए. (मराठी) आणि एम. ए. – (इतिहास) अशा दोन पदव्या संपादित केल्या आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. डॉ. पवार यांच्याबरोबर अनेक इतिहास परिषदामध्ये सहभागी होऊन त्यांनी परिषदांच्या व्यासपीठांवर अनेक शोधनिबंध सादर केले आहेत. प्रस्तुत लेखसंग्रहात त्यांच्या अशा प्रकारच्या काही शोधनिबंधांचा समावेश आहे. सौ. पवार यांच्या या लेखांतून राजर्षी शाहू छत्रपतींच्या बहुविध लोककल्याणकारी धोरणांवर प्रकाश टाकला गेला आहे. तत्कालीन शेकडो हिंदी संस्थानिकांपैकी फक्त शाहू छत्रपतींनाच लोकांनी राजर्षी ही पदवी का बहाल केली, याचे रहस्य लेखिकेने उलगडून दाखविले आहे. सौ. पवार यांचा गेल्या शतकातील थोर समाजसुधारक दिनकरराव शिंदे यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा स्मृतिग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. यापूर्वी समाजशिक्षण माले – तून त्यांनी स्वातंत्र्यसौदामिनी महाराणी ताराबाई यांचे चरित्र प्रकाशित केले आहे. याशिवाय क्रांतिसिंह नाना पाटील या ग्रंथाला संपादन-साहाय्य केले आहे.

Reviews
There are no reviews yet.