PUPPET ON A CHAIN – पपेट ऑन ए चेन
₹220.00
Product Highlights
अॅलिस्टर मॅक्लीन यांच्या मर्दुमकी गाजवणार्या अनेक नायकांपैकी ’पपेट ऑन ए चेन’ चा नायक, पॉल शेर्मन. इंटरपोलच्या अंमली द्रव्य विरोधी विभागाचा एक दमदार अधिकारी… पॉलवर हॉलंडमध्ये जाऊन अॅमस्टरडॅममधल्या संशयास्पद अंमली द्रव्यांच्या व्यवहाराचा वेध घेण्याची कामगिरी सोपवली जाते. पॉल अॅमस्टरमध्ये विमानातून उतरताक्षणीच त्याच्या एका सहकार्याची हत्या होते. आणि त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू होते. अॅमस्टरडॅममधले अंधार्या रात्री पॉलला नकळत काहीकाही सुचवू लागतात. त्याच्या आजूबाजूच्या जगाचे मुखवटे आणि चेहरे उघड होऊ लागतात. अंधारातल्या गूढसावल्या त्याला खुणावत राहतात. अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी खास मॅक्लीन शैलीतली ही कादंबरी वाचकाला सहजपणे एका अद्भूत गूढ वातावरणात घेऊन जाते. पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा वाचताना रक्त गोठेल, काळजाचा ठोका नक्कीच चुकेल….
Description
PAUL SHERMAN IS ONE OF THE HEROES COLOURED BY ALISTER MACLEAN. HE IS A VERY RESPONSIBLE OFFICER IN THE INTERPOL, WORKING IN THE ANTI-DRUGS DEPARTMENT. HE IS ASSIGNED WITH THE TASK OF FINDING OUT THE DETAILS ABOUT THE SUSPICIOUS DRUG OPERATION IN AMSTERDAM, IN HOLLAND. THE MOMENT HE AND HIS COLLEAGUE LAND ON THE AIRPORT OF AMSTERDAM, HIS COLLEAGUE GETS KILLED FURTHER LEADING INTO A SERIES OF DISASTERS. PAUL FINDS HIS CLUES ON THE ROADS, CANALS, CHURCHES, BUILDINGS OF AMSTERDAM, EACH SUGGESTING SOMETHING. HE GETS ATTRACTED TOWARDS THE SHADOWS, EQUALLY MYSTERIOUS. EVERY SINGLE LINE WILL BRING FORWARD THE ADVENTURES OF PAUL, HIS MISSION, HIS ATTACKS, A THRILLING SUSPENSE WITH ALL THE CHARACTERISTIC FEATURES OF ALISTER MACLEAN.
Brand
ALISTAIR MACLEAN
Birth Date : 21/04/1922
Death Date : 02/02/1987
अॅलिस्टर मॅक्लीन यांचा जन्म २८ एप्रिल, १९२२ रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झाला. त्यांचे बालपण आणि तारुण्य डेव्हिऑट येथे गेले. १९४१ साली त्यांनी रॉयल नेव्हीमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या महायुद्धात भागही घेतला. १९४६ साली नौदलातून बाहेर पडल्यानंतर ते ग्लासगो विद्यापीठ येथे इंग्रजीचा अभ्यास करू लागले. १९५३ साली त्यांनी पदवी संपादन केली आणि रुदरग्लेन येथे शिक्षक म्हणून काम करू लागले. विद्यापीठात अध्ययन करताना अर्थार्जनासाठी ते लघुकथा लिहू लागले. १९५४ साली डिलिअॅस ही कथा लिहून त्यांनी एका लेखनस्पर्धेत बक्षीस मिळवले. कॉलिन्स प्रकाशन संस्थेने त्यांच्यासमोर कादंबरी लेखनाचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव स्वीकारून त्यांनी युद्धात आलेल्या अनुभवांवर एच.एम.एस. यूलिसिस ही कादंबरी लिहिली. या कादंबरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि लवकरच मॅक्लीन यांनी पूर्ण वेळ युद्धकथा, गुप्तहेरकथा आणि साहसकथा लिहिण्यास सुरुवात केली. मुखपृष्ठावर अॅलिस्टर मॅक्लीन हे नाव असल्याने नाही तर साहित्यच दर्जेदार असल्याने पुस्तके लोकप्रिय आहेत, हे दाखवून देण्यासाठी मॅक्लीन यांनी इयान स्टुअर्ट या टोपणनावाने दोन कादंबऱ्या लिहिल्या. या दोन्ही कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. समकालीन लेखकांपेक्षा मॅक्लीन यांची लेखनशैली वेगळी होती. प्रणयाची भडक वर्णने त्यांच्या साहित्यात आढळत नाहीत. त्यांच्या मते अशी वर्णने मूळ कथेचा वेग आणि थरारकता यांना मारक ठरतात. निसर्ग; त्यातही समुद्र आणि उत्तर आाQक्र्टकच्या पार्श्वभूमीचा त्यांच्या कादंबऱ्यामधून विशेष वापर केला गेला आहे. मॅक्लीन यांच्या २८ कादंबNया आणि काही कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. स्वत:च्या कादंबNयांवर आधारित काही पटकथाही त्यांनी लिहिल्या आहेत. १९८३ साली ग्लासगो विद्यापीठाकडून त्यांना साहित्यासाठी डॉक्टरेट देण्यात आली. २ पेÂब्रुवारी, १९८७ साली मॅक्लीन यांचा मृत्यू झाला.
Reviews
There are no reviews yet.