PUNE TE PANTAPRADHANANCHE KARYALAYA – पुणे ते पंतप्रधानांचे कार्यालय
₹400.00
Product Highlights
…बोफोर्ससारख्या प्रकरणांचा जन्म इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत झाला. पुढे काँग्रेस पक्षाला पैसे मिळवून देण्यासाठी संजय गांधी यांनी हे तंत्र पाहिजे तसे सुधारले… …राजीव गांधी यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीही बोफोर्स प्रकरणामध्ये दलाली, कमिशन अथवा पैसे घेतले नाहीत. पण तरीही परिस्थितीजन्य पुरावे हेच दर्शवितात की, दलाली घेतलेल्यांची नावे त्यांना ठाऊक होती आणि ती नावे उघड करण्यास ते नाखूष होते. कदाचित ती नावे काँग्रेस पक्षातील व्यक्तींची असतील, जवळच्या नातेवाईकांची किंवा मित्रांचीही असतील. ही नावे त्यांना बोफोर्सचा करार पक्का होण्यापूर्वी कळली होती की, करार झाल्यानंतर कळली होती? …शिक्षणसंस्था, सैन्य, निमलष्करी दले आणि सरकारी नोक-यांतील बढत्या येथे आरक्षणाचे धोरण राबवले जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी दिले होते. पण तरीही आरक्षणविरोधी भावना शमली नाही. ….लटपट्या व भोंदू तांत्रिक चंद्रास्वामी हा भारतात आज रात्री परतत आहे, ही बातमी महसूल सचिव मिश्रा यांनी पंतप्रधान चंद्रशेखर यांना दिली. परंतु या बातमीमुळे त्यांना फारसा आनंद झालेला दिसत नव्हता, म्हणून मी असा तर्क काढला की, आता ही बातमी चंद्रास्वामी यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. मग ते भारतात परतण्याचे नक्की रहित करतील. अन् शेवटी तसेच झाले. आता मिश्रा यांची लवकरच बदली होणार हे मी हेरले.
Description
DURING THE REIGN OF INDIRA GANDHI, SCANDALS LIKE THE BOFORS WERE BORN. LATER, TO GAIN MONEY FOR THE CONGRESS PARTY, SANJAY GANDHI MODIFIED THIS. NEITHER RAJIV GANDHI NOR ANY OF HIS FAMILY MEMBERS TOOK COMMISSION IN ANY FORM DURING BOFORS, BUT AT THE SAME TIME, IT IS TRUE THAT THEY WERE NOT READY TO REVEAL THE NAMES OF PERSONS INVOLVED IN THIS SCANDAL OF WHICH THEY WERE AWARE OF. MAY BE THE PERSONS INVOLVED WERE EITHER MEMBERS OF CONGRESS OR RELATIVES OR VERY CLOSE FRIENDS OF THE GANDHI FAMILY. WERE THEY AWARE OF THESE NAMES BEFORE THE BOFORS AGREEMENT OR AFTER THE AGREEMENT? PRIME MINISTER V.P. SINGH HAD ASSURED THAT THE RESERVATION STRATEGY WILL NOT BE PLAYED IN THE EDUCATION SYSTEMS, ARMY, SECURITY FORCES, AND THE PROMOTIONS IN GOVERNMENT SERVICES, BUT THIS ASSURANCE DID NOT COOL DOWN THE ANTI-RESERVATION MOVEMENT. REVENUE MINISTER MISHRA HAD INFORMED PRIME MINISTER THAT “TONIGHT, THE HYPOCRITE CHANDRASWAMI IS LANDING IN INDIA`. THE PRIME MINISTER WAS NOT VERY HAPPY TO HEAR THIS, SO I CONCLUDED THAT THIS NEWS WILL REACH CHANDRASWAMI AND THEN HE WILL CANCEL HIS COMING BACK TO INDIA. THAT IS WHAT HAPPENED AT THE END. I GUESSED THAT VERY SOON MISHRA WILL BE TRANSFERRED.
Brand
B.G. DESHMUKH
भालचंद्र देशमुख हे बी. जी. देशमुख या लोकप्रिय नावाने ओळखले जातात. १९५१ साली त्यावेळच्या मुंबई इलाख्यातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ते आय.ए.एस. बनले. महाराष्ट्र आणि गुजराथमध्ये त्यांनी विविध पदांवरती कामे केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ते विशेष सचिव होते. नंतर ते मुंबई महापालिकेचे आयुक्त बनले. राजीव गांधी यांनी त्यांना १९८६मध्ये दिल्लीला बोलावून घेतले आणि मंत्रिमंडळ सचिव (कॅबिनेट सेक्रेटरी) या प्रशासनातील सर्वोच्च पदावर नेमणूक केली. १९८९मध्ये राजीव गांधी यांनी त्यांना आपले मुख्य सचिव (प्रिन्सिपल सेक्रेटरी) म्हणून नेमले. राजीव गांधी यांच्यानंतर व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर हे पंतप्रधान झाले. परंतु त्यांनीही देशमुख यांना मुख्य सचिव पदावर ठेवून त्यांच्या सेवेचा मान वाढविला. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ह्या संस्थेच्या कार्यकारी मंडळावरती ते होते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी , जनवाणी , एमसीसीआयए या संस्थांचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले. छत्रपती शिवाजीमहाराज वस्तूसंग्रहालय , केईएम हॉस्पिटल आणि मोहल्ला चळवळ समिती ट्रस्ट अशा विविध सामाजिक संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केले होते.
Reviews
There are no reviews yet.