PREY – प्रे
₹300.00
Product Highlights
नेवाडा वाळवंटातल्या एका कंपनीत चालू असणा-या प्रयोगांमध्ये भयंकर विचका झालेला आहे. सूक्ष्म आकाराचे जणू यंत्रमानव असावेत अशा नॅनोकणांचा एक ढग प्रयोगशाळेतून निसटला. हा ढग बुद्धिमान आहे. तो सहज शिकू शकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो. निराळ्या शब्दात सांगायचं तर तो `जिवंत` आहे. त्याची रचना एक शिकारी म्हणून झालेली आहे. तो उत्क्रांत होतोय. दर तासाला त्याचं स्वरूप अधिकच भयानक होत चाललंय. त्याला नष्ट करण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. ह्या शिकारी ढगाचं सावज आपण आहोत….
Description
IN THE NEVADA DESERT, AN EXPERIMENT HAS GONE HORRIBLY WRONG. A CLOUD OF NANOPARTICLES—MICRO-ROBOTS—HAS ESCAPED FROM THE LABORATORY. THIS CLOUD IS SELF-SUSTAINING AND SELF-REPRODUCING. IT IS INTELLIGENT AND LEARNS FROM EXPERIENCE. FOR ALL PRACTICAL PURPOSES, IT IS ALIVE. IT HAS BEEN PROGRAMMED AS A PREDATOR. IT IS EVOLVING SWIFTLY, BECOMING MORE DEADLY WITH EACH PASSING HOUR. EVERY ATTEMPT TO DESTROY IT HAS FAILED. AND WE ARE THE PREY.
Brand
MICHAEL CRICHTON
Birth Date : 23/10/1942
Death Date : 04/11/2008
मायकेल क्रायटन यांची वीस कोटींपेक्षा जास्त पुस्तके खपली असून त्यांच्या पुस्तकांचे जगभरात ३६ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या १३ पुस्तकांवर चित्रपट निघाले आहेत. त्यांच्या द अन्ड्रोमिडा स्ट्रेन, ज्युरासिक पार्क, नेक्स्ट, टाइम लाइन, डिस्क्लोजर, प्रे, स्टेट ऑफ फिअर आणि पायरेट लॅटिट्यूड्स या कादंबऱ्यांनी लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले आहेत. एकाच वेळी पुस्तक, चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रम हे सर्वोच्च स्थानी असण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सन २००८ मध्ये मायकेल क्रायटन यांचा मृत्यू झाला, त्यावेळी मायक्रो ही कादंबरी जवळजवळ पूर्ण झाली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ती रिचर्ड प्रेस्टन यांनी पूर्ण केली. विज्ञानावर आधारलेल्या थरारक व रहस्यमय कथानकांनी वाचकांना खिळवून टाकणाऱ्या मायकेल क्रायटन यांना अफाट लोकप्रियता लाभली. हार्वर्ड विद्यापीठातून एम.डी. पदवी घेतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. जॉन लांग आणि मायकेल डग्लस या टोपणनावांनी दहा कादंबऱ्या लिहिल्यानंतर १९६९मध्ये आलेली द अन्ड्रोमीडा स्ट्रेन ही पहिलीच कादंबरी खळबळजनक ठरली.
Reviews
There are no reviews yet.