PRESCRIPTIONS FOR LIVING – प्रिस्क्रिप्शन्स फॉर लिव्हिंग
₹295.00
Brand
BERNIE SIEGEL
स्वत:ला ‘बर्नी’ या नावाने संबोधित केले जावे असे त्यांना वाटते. न्यू हेवन येथील कनेक्टिकट येथे १९८९ पर्यंत जनरल व लहान मुलांचे चिकित्सक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७८ मध्ये त्यांनी रुग्णांचे सशक्तीकरण व जीवनातील आनंद घेत शांत चित्ताने मृत्यूला सामोरे जाणे या विषयावर मांडणी करायला सुरुवात केली. त्यांनी ‘केअरफ्रन्टेशन’ (CAREFRONTATION-CARE & CONFRONTATION) नावाने कर्करोग झालेल्या अपवादात्मक रुग्णांच्या गटाची स्थापना केली. बर्नी यांची ज्या तत्त्वज्ञानावर श्रद्धा आहे ते तत्त्वज्ञान त्यांनी वैद्यकीय नीतिमत्ता व अध्यात्मिक बाबींमुळे गोंधळून गेलेल्या समाजासमोर ठेवले. त्यांची १९८६ साली ‘लव्ह, मेडिसिन अॅण्ड मिरॅकल्स’, १९८९ साली ‘पीस, लव्ह अॅण्ड हीलिंग’, १९९३ साली ‘हाऊ टू लिव्ह बिट्विन ऑफिस व्हिजिट्स’ आणि १९९८ साली ‘प्रिस्क्रीप्शन फॉर लिव्हींग’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांद्वारे आजारातून बरे होणे या विषयांवरील नवीन संकल्पना त्यांनी सादर केल्या आहेत. आता बर्नी आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणात मानवतावादी दृष्टिकोन आणण्यासाठी झटत आहेत. ते व त्यांची पत्नी बॉबी सध्या या विषयावर व्याख्यान देणे, कार्यशाळा आयोजित करणे याबद्दलचे तंत्र व अनुभव सर्वांसमोर आणणे यासाठी अविरत प्रवास करीत आहेत.
Reviews
There are no reviews yet.