PRARTHANA – प्रार्थना
₹220.00
Product Highlights
निसर्गरम्य गोव्याच्या पाश्र्वभूमीवर आजवर अनेकानेक कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत; परंतु गोव्यातील समकालीन समुह-जीवनाचं यथायोग्य चित्रण करणारी ही पहिलीच कादंबरी आहे. भाषा, वंश, धर्म, चालीरीतींनी आणि भिन्न जीवनशैलींनी बध्द अशा अनेकानेक व्यक्ती तुम्हांला या कादंबरीत भेटतात. त्यांचे आपापसांतील संबंध, संघर्ष, त्यांचे भावना-विचारांचे कल्लोळ, त्यांच्यातील विहित-अविहित नाती, औरस-अनौरस संबंध यांचं सिध्दहस्त लेखणीनं केलेलं चित्रण पाहून वाचक केवळ स्तिमित होईल. या कादंबरीचं उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा आकृतिबंध हे आहे. पारंपारिक सर्वमान्य असा आकृतीबंध न निवडता, कादंबरीच्या प्रकृतीनं स्वत:च स्वत:साठी घडवलेला हा आकृतिबंध लेखिकेच्या सर्जनशक्तीच्या विस्तृत परिघाचं मनोज्ञ दर्शन घडवतो. महालक्ष्मी आणि सरस्वती या दोन देवींचं वास्तव्य असलेल्या आणि निसर्गदत्त सौदर्यानं नटलेल्या गोव्याच्या पाश्र्वभूमीवरची व्यामिश्र समाजजीवन यथार्थपणे चित्रीत करणारी ही समर्थ कादंबरी वाचकाला अस्वस्थ करुन सोडील!
Description
TILL DATE, THERE HAVE BEEN MANY NOVELS PUBLISHED ON THE SERENE AND BEAUTIFUL BACKGROUND OF GOA. YET, THIS IS THE FIRST OF ITS TYPE DESCRIBING THE CONTEMPORARY LIFE IN GOA. WE COME ACROSS PEOPLE FROM VARIOUS RELIGION, CREED AND RACE SPEAKING VARIOUS LANGUAGES AND FOLLOWING VIVID CULTURES. THEIR STRUGGLES, CONFLICTS, EMOTIONS, FEELINGS, LAWFUL AND UNLAWFUL RELATIONS, LEGITIMATE AND ILLEGITIMATE CHILDREN, ALL HAVE BEEN WELL PORTRAYED. THE STYLE EMBRACED BY THE AUTHOR ITSELF IS PROOF ENOUGH OF HER LITERARY SKILLS. IT ALSO SHEDS LIGHT ON THE DEPTH OF HER KNOWLEDGE, UNDERSTANDING CAPABILITIES AND INNOVATIVENESS. HER MULTI-FACETED NATURE HAS GIVEN A TENDER TOUCH TO IT AS WELL. THIS NOVEL HAS POTENTIALS ENOUGH TO LEAVE THE READERS IN AN UNEASY STATE OF MIND.
Brand
MADHAVI DESAI
Birth Date : 21/07/1933
Death Date : 15/07/2013
माधवी देसाई यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला, पण त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ गोव्यामध्येच व्यतीत केला. मराठी चित्रपटांचे निर्माते आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कै. भालजी पेंढारकर हे त्यांचे वडील. माधवीतार्इंना कलेचा, साहित्याचा वारसा घराण्याकडूनच मिळाला. माधवीतार्इंनी जवळ-जवळ १६ वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केले. नंतर त्या गोव्यामध्ये वास्तव्यास गेल्या. त्या २५ वर्षे तेथे राहिल्या. आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा प्रारंभही त्यांनी तेथेच केला. अखिल गोवा साहित्य संमेलनाची स्थापनाही त्यांनी केली. त्यांनी जवळ-जवळ ३८ पुस्तके लिहिली. नाच ग घुमा या त्यांच्या आत्मचरित्राला यशो दामिनी हा साहित्य पुरस्कारही मिळाला. प्रतारणा व सीमारेषा या त्यांच्या पुस्तकांना कला अॅकॅडमी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. देवराई, जगावेगळी, नियती, कांचनगंगा, मंजिरी, प्रार्थना, हरवलेल्या वाटा, स्वयंसिद्धा आम्ही, शाल्मली, आवतन या त्यांच्या कादंबऱ्याही खूप गाजल्या. असं म्हणू नकोस, कथा सावलीची, सागर, किनारा, शुक्रचांदणी हे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी घे भरारी या चित्रपटासाठी पटकथा व संवाद लेखनही केले. या चित्रपटाला अल्फा गौरव अॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते.
Reviews
There are no reviews yet.