PLEASURE BOX BHAG 1 – प्लेझर बॉक्स भाग १
₹160.00
Product Highlights
वपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक. हर्ष, हुंदके आणि हुंकार ह्यांच्या हा नजराणा.हा नजराणा असंख्य वाचकांनी केलेला.रोज कुणाचं न कुणाचं पत्र दारासमोर रांगोळी काढता येतं.`तुम्ही आम्हाला ओळखत नाही,पण आम्ही तुम्हाला ओळखतो`.ह्यासारख्या परिचयाच्या ठिपक्याठिपक्यांनी रांगोळी प्रगट होते.रांगोळी काढणाऱ्याचे हात दिसत नाहीत आणि कधी कधी नावही काळात नाही.तसं झालं की आठवतो तो सांताक्लाँझ!पत्रांची भेट पाठवणारे सांताक्लाँझ?की त्यांची भेट माझ्या दारावरच्या प्लेझरबॉक्स पर्यंत पोहचवणारा खाकी वेशातला पोस्टमन सांताक्लाँझ?.हे कोडं सुटत नाही.जाऊ दे!न सुटू दे.संवादाचा पूल ऐलथडीला जोडणारी प्रत्येक कमान सारख्याच तोलामोलाची.सगळेच सांताक्लाँझ.सांताक्लाँझची पाऊल आता आपोआप ऐकू येतात.ती वेळ अचूक समजते.पण एखादाच दिवस असा उगवतो की त्या दिवशी ती चाहूल येत नाही.ऐन दुपारी येणारा रातराणीचा सुगंध त्या दिवशी येत नाही.”वपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक.” हर्ष, हुंदके आणि हुंकार ह्यांच्या हा नजराणा.हा नजराणा असंख्य वाचकांनी केलेला.रोज कुणाचं न कुणाचं पत्र दारासमोर रांगोळी काढता येतं.`तुम्ही आम्हाला ओळखत नाही,पण आम्ही तुम्हाला ओळखतो`.ह्यासारख्या परिचयाच्या ठिपक्याठिपक्यांनी रांगोळी प्रगट होते.रांगोळी काढणाऱ्याचे हात दिसत नाहीत आणि कधी कधी नावही काळात नाही.तसं झालं की आठवतो तो सांताक्लाँझ!पत्रांची भेट पाठवणारे सांताक्लाँझ?की त्यांची भेट माझ्या दारावरच्या प्लेझरबॉक्स पर्यंत पोहचवणारा खाकी वेशातला पोस्टमन सांताक्लाँझ?.हे कोडं सुटत नाही.जाऊ दे!न सुटू दे.संवादाचा पूल ऐलथडीला जोडणारी प्रत्येक कमान सारख्याच तोलामोलाची.सगळेच सांताक्लाँझ.सांताक्लाँझची पाऊल आता आपोआप ऐकू येतात.ती वेळ अचूक समजते.पण एखादाच दिवस असा उगवतो की त्या दिवशी ती चाहूल येत नाही.ऐन दुपारी येणारा रातराणीचा सुगंध त्या दिवशी येत नाही.
Description
GERMINATE LIKE THE SEED AND GROW INTO A TREE. MERGE LIKE A DROP OR A WAVE AND BECOME LIKE THE OCEAN. DROWN! MERGE! CEASE TO EXIST! SURRENDER YOURSELF COMPLETELY INTO THE SELF; LOSE YOUR DUALITY; THEN YOU WILL BECOME THE OCEAN! BECOME VAST! THERE WILL BE NO MORE BOUNDARIES, NO SORROW, AND NO PAIN. YOU WILL BE NEITHER POOR NOR MEEK. YOU WILL BE ACCOMPLISHED, WEALTHY, AND LIKE A KING. ALL DIVINE INCARNATIONS ARE YOUR REFLECTIONS. YOU ARE NO LONGER ‘YOU’; YOU ARE GOD!
Brand
V.P.KALE
Birth Date : 25/03/1932
Death Date : 26/03/2001
लेखक, कथाकथनकार, आर्कीटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या. मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या. विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा. खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत. एका व्यक्तीच्या विचार-आचारांची पद्धत. वपु त्याला पॅटर्न म्हणायचे. वपुंनी पॅटन्र्स मांडले. जे आपल्यासहित, आपल्या आवती-भोवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटन्र्सना दाद मिळते. विनोदी कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तऱ्हा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. महाराष्ट्र सरकारनं त्यांना उत्तम लेखक म्हणून सन्मानित केलं आहे. पु.भा. भावे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. फाय फाउंडेशनने त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले. अनेक रंग मनाचे दाखविणाऱ्या वपुंना अनेक जण आपला पार्टनर मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. २५ मार्च, १९३२ ते २६ जून, २००१… आणि गणती पुढे चालूच आहे. कारण वपु काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा हुंकार अजूनही वन फॉर द रोड करता दिला-घेतला जातोय. हा दोस्त असाच दोस्ती निभावत राहणार आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार..

Reviews
There are no reviews yet.