PIRATE LATITUDES – पायरेट लॅटिट्युड्स
₹330.00
Product Highlights
जमैकातील ब्रिटिश वसाहतीची राजधानी १६६५मध्ये पोर्ट रॉयल या बंदरावर होती. गलिच्छ रस्ते, कुंटणखाने आणि रासवट खलाश्यांसाठीच्या खानावळी असलेल्या या ठिकाणाहून भरभक्कम अशा स्पॅनिश ठाण्यांवर कोणी हल्ला करू शकेल, हे कल्पनेच्याही पलीकडचं होतं. पण चाल्र्स हंटर या नावाजलेल्या प्रायव्हटीरने नेमकं हेच करायचं ठरवलं. त्याला जमैकाचा गव्हर्नर सर जेम्स अलमॉन्टचा पािंठबा होता. चाल्र्स हंटर मातानकेरॉसवर धाड घालायला निघतो. सगळ्या संकटांवर मात करत हंटर खजिन्याचं जहाज लुटून परत पोर्ट रॉयलमध्ये येतो. आपलं भव्य स्वागत होईल, अशी त्याची अपेक्षा असते, पण….
Description
JAMAICA, IN 1665 A LONE OUTPOST OF BRITISH POWER AMID SPANISH WATERS IN THE SUNBAKED CARIBBEAN. ITS CAPITAL, PORT ROYAL, A CUTHROAT TOWN OF TAVERNS, GROG SHOPS AND BAWDY HOUSES – THE LAST PLACE IMAGINABLE FROM WHICH TO LAUNCH AN UNTHINKABLE ATTACK ON A NEARBY SPANISH STRONGHOLD. YET THAT IS EXACTLY WHAT RENOWNED PRIVATEER CAPTAIN CHARLES HUNTER PLANS TO DO, WITH THE CONNIVANCE OF CHARLES II`S RULING GOVERNOR, SIR JAMES ALMONT. THE TARGET IS MATANCEROS, GUARDED BY THE BLOODTHIRSTY CAZALLA, AND CONSIDERED IMPREGNABLE WITH ITS GUN EMPLACEMENTS AND SHEER CLIFFS. HUNTER`S CREW OF BUCCANEERS MUST BATTLE NOT ONLY THE SPANISH FLEET BUT OTHER DEADLY PERILS – RAGING HURRICANES, CANNIBAL TRIBES, EVEN SEA MONSTERS. BUT IF HIS RAGTAG CREW SUCCEEDS, THEY WILL MAKE NOT ONLY HISTORY … BUT A FORTUNE IN GOLD.
Brand
MICHAEL CRICHTON
Birth Date : 23/10/1942
Death Date : 04/11/2008
मायकेल क्रायटन यांची वीस कोटींपेक्षा जास्त पुस्तके खपली असून त्यांच्या पुस्तकांचे जगभरात ३६ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या १३ पुस्तकांवर चित्रपट निघाले आहेत. त्यांच्या द अन्ड्रोमिडा स्ट्रेन, ज्युरासिक पार्क, नेक्स्ट, टाइम लाइन, डिस्क्लोजर, प्रे, स्टेट ऑफ फिअर आणि पायरेट लॅटिट्यूड्स या कादंबऱ्यांनी लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले आहेत. एकाच वेळी पुस्तक, चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रम हे सर्वोच्च स्थानी असण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सन २००८ मध्ये मायकेल क्रायटन यांचा मृत्यू झाला, त्यावेळी मायक्रो ही कादंबरी जवळजवळ पूर्ण झाली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ती रिचर्ड प्रेस्टन यांनी पूर्ण केली. विज्ञानावर आधारलेल्या थरारक व रहस्यमय कथानकांनी वाचकांना खिळवून टाकणाऱ्या मायकेल क्रायटन यांना अफाट लोकप्रियता लाभली. हार्वर्ड विद्यापीठातून एम.डी. पदवी घेतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. जॉन लांग आणि मायकेल डग्लस या टोपणनावांनी दहा कादंबऱ्या लिहिल्यानंतर १९६९मध्ये आलेली द अन्ड्रोमीडा स्ट्रेन ही पहिलीच कादंबरी खळबळजनक ठरली.
Reviews
There are no reviews yet.