PASANG – पासंग
₹170.00
Product Highlights
पासंग म्हणजे काय? `पासंगालाही काही पुरात नाही` या अर्थाची म्हण मराठीत आहे. `क्षुल्लक` या अर्थाने ती वापरली जाते. तराजूच्या दांड्याला, दोन तागडी समतोल राहावीत, म्हणून छोटेसे जे वजन लावले जाते, ते `पासंग`. आंबेडकरी चळवळीत कळू लागल्यापासून एकात आलो आहे, की दलितांचे राजकारण हे पासंगाचे राजकारण आहे. याचा अर्थच असा, की समाज समतोल ठेवायचा असेल, तर दलितांनी पासंगासारखे राहावयास हवे. समाजाचे एकारलेपण दलितांमुळेच समतोल होऊ शकते, हा बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार होता. अनेक `पासंगात` जातिधर्मनिरपेक्ष अशा अनेक घटना आणि व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. केवळ दलितांचे, त्यांच्या चळवळीचे उदात्तीकरण केले नाही, तर त्यांच्यावर त्यांच्या चळवळीवर कठोर आघातही केले आहेत. समाजाच्या सर्व थरांत ज्या घटना किंवा व्यक्ती `फूटनोट` म्हणून आजवर दुर्लक्षित ठेवण्यात आल्या, त्यांचा शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
Description
WHAT IS MEAN BY PASANG ? `PAASANG` IN MARATHI HAS A DEFINITE MEANING. IT IS ACTUALLY THE SMALL WEIGHT WHICH BALANCES BETWEEN THE TWO SIDES OF A WEIGHING SCALE. GENERALLY, IT IS USED TO SHOW THE MINUTENESS OF A THING. I WAS INVOLVED IN AMBEDKAR MOVEMENT SINCE MY YOUNG AGE. I HAVE COME ACROSS THIS WORD DURING THAT PERIOD SAYING THAT, THE MOVEMENT OF DALIT`S IS VERY WEAK AND THE PLACE THEY HAVE IN POLITICS IS JUST NEGLIGIBLE, IT IS JUST EQUIVALENT TO `PAASANG`. THIS CLEARLY REVEALS THAT DALITS` EXISTENCE IS JUST TO BALANCE THE TWO SIDES OF THE WEIGHING SCALE. DR. BABASAHEB AMBEDKAR BELIEVED THAT POLITICALLY THE PRESENCE OF DALIT WILL BALANCE THE SOCIETY. THROUGH THIS BOOK I AM TRYING TO FIND OUT THE IGNORED INCIDENTS OR PERSONS OF THIS SOCIETY. SOME OF THEM HAVE SUPPORTED THE DALITS FOR SURE, BUT AT THE SAME TIME IT IS A FACT THAT SOME OF THEM HAVE PRESSURIZED THE MOVEMENTS OF DALIT, HAVE ATTACKED THEM VIGOROUSLY.
Brand
DAYA PAWAR
Birth Date : 15/09/1935
Death Date : 20/12/1996
दया पवार म्हणजेच दगडू मारुती पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे झाला. १९५६मध्ये मुंबईतील पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी लेखनिक व प्रयोगशाळा सहायक म्हणून नोकरीस सुरुवात केली. १९६७मध्ये अस्मितादर्श मध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. दलित साहित्य चळवळीच्या कार्यात १९६८पासून त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९६९मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान मुखपत्रात त्यांचा दलित साहित्यावर लिहिलेला लेख पहिल्यांदा प्रसिद्ध झाला. श्रीलंकेत कोलंबोमध्ये १९७५ला भरलेल्या जागतिक बुद्ध परिषदेलाही ते हजर होते. दया पवार यांनी विपुल लिखाण केले. त्यांपैकी बलुतं हे १९७८मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले. दलित जीवनाची एक वेगळी ओळख त्यांनी यातून करून दिली. १९७९मध्ये राज्य शासनाचा पुरस्कारही त्याला मिळाला. १९८१मध्ये बलुतंची हिंदी आवृत्ती प्रकाशित झाली. त्या आधी कोंडवाडा (१९७४) या त्यांच्या काव्यसंग्रहालाही १९७५मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. १९८२मध्ये फोर्ड फाउंडेशन ची शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त झाली. त्यासाठी ते अमेरिकेला गेले होते. १९८४ला जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे भरलेल्या वर्ल्ड बुक फेअरमध्ये दलित साहित्यावर त्यांनी एक शोधनिबंध सादर केला होता. १९८८ ते १९९४ या कालावधीत ते बालभारती पाठ्यपुस्तक समितीचे सदस्य होते. १९८७ ते १९९४ या दरम्यान महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. १९९०मध्ये दया पवार यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. १९९३मध्ये महाराष्ट्र राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य होते. याशिवाय विटाळ कथासंग्रह (१९८३), बलुतं एक वादळ (१९८३), चावडी स्फुटलेख (१९८३), पासंग(१९९३) व जागल्या स्तंभलेखन, पाणी कुठंवर आलं गं बाई काव्यसंग्रह, कल्लपा यशवंत ढाले यांची डायरी (१९८४), धम्मपद पाली भाषेतील धम्मपदांचा मराठी अनुवाद (१९९१) असे आजवर त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित झाले. फिल्म डिव्हिजनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील लघुपटाचे कथालेखन (१९९३) त्यांनी केले. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपटाच्या पटकथा लेखनातही त्यांचा सहभाग होता. १९९४-९५मध्ये ते परिवर्तन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते.2
Reviews
There are no reviews yet.