PANI KUTHAVAR AALA GA BAI… पाणी कुठंवर आलं गं बाई
₹70.00
Product Highlights
दया पवार यांच्या ‘कोंडवाडा’ नंतरचा हा दुसरा कवितासंग्रह. त्यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनानं मराठी साहित्याला मोलाचं योगदान दिलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील त्यांचा लौकिक ‘बलुतं’मुळंच पोहोचला. असं असलं तरी दया पवारांचा मूळ िंपड हा अखेरपर्यंत अस्सल समकालीन कवीचाच राहिला. ‘कोंडवाडा’मधून त्यांनी स्वत:ची अशी वेगळी कविता नोंदवली. विद्रोहाच्या तप्त आवाजाच्या कोलाहलातही स्पष्टपणे ऐवूÂ येणारी साधी, संयत आणि न एकारलेली. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई…’ मध्ये हा शोध अधिक प्रगल्भतेनं आणि समग्रपणे व्यक्त झाला आहे. दया पवारांच्या संवेदनशीलतेला या संग्रहात आणखी एक महत्त्वाचं परिमाण लाभलं आहे. सर्वांत पायतळी असलेल्या कष्टकरी, दलित स्त्रीच्या अपार दु:खाचं. लोकगीताच्या देशीय रूपबंधातून दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर दया पवारांनी अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं जागता ठेवला. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई…’ या संग्रहाच्या शीर्षओळीपासूनच हे जाणवतं की, दलित स्त्रीच्या जगण्यात – तिच्या आQस्तत्वात, दया पवार सबंध व्यवस्थेचं प्रतिरूप अनुभवतात. भारताच्या सांस्कृतिक बेटांमधली दरी नाहीशी व्हावी यासाठी ‘माझी कविता बळी पडली तरी चालेल,’ असे दया पवारांनी कोंडवड्याच्या प्रस्तावनेत लिहिले आहे… ‘धारदार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपा होतात, तसं आपण हसत मरावं…’ त्यांच्या या भूमिकेचा पुनरुच्चार ‘पाणी कुठंवर आलं गं बाई…’मधूनही शेवटपर्यंत जाणवतो. कवी दया पवारांचे ‘समकालीनत्व’ अधोरेखित करणारा हा संग्रह मराठीच्या मध्यवर्ती प्रवाहात अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरावा. प्रा. प्रज्ञा लोखंड
Description
THIS IS A SECOND COLLECTION OF POEMS AFTER DAYA PAWAR`S KONDWADA. HIS AUTOBIOGRAPHY ` BALAUTAM` CONTRIBUTED VALUABLE TO MARATHI LITERATURE AND AT THE INTERNATIONAL LEVEL. HE ALSO REACHED HIS COSMIC `BALAUTAM`. IN SPITE OF THIS. DAYA PAWAR’S ORIGINAL ORIGIN REMAINS AS A GENUINE CONTEMPORARY POET. HE WROTE HIS OWN POEM IN KONDWADA. THERE IS A SIMPLE, EASY TO- USE AND NON -ACCELERATED MOVE TO REBEL AGAINST REBELLION. THIS DISCOVERY HAS BEEN SHOWN IN MORE COMPLEXITY AND OVERALL IN WHERE DID WATER COMES FROM? DAYA PAWAR SENSITIVITY IS ANOTHER IMPORTANT ASPECT IN THIS COLLECTION. THE HARD WORK OF THE YOUNGEST, THE OPPRESS WOMEN, THE MISERY OF THE DALIT WOMEN`S PAIN HAS PERSISTENTLY KEPT ON MANY PLATFORMS. FROM THE TOP OF THE COLLECTION ` WHERE DID WATER COMES FROM? IT IS UNDERSTOOD THAT IN THE LIFE OF DALIT WOMEN- IN HER Q- LEVEL, MERCY PAWAR EXPERIENCE A WHOLE SYSTEM.
Brand
DAYA PAWAR
Birth Date : 15/09/1935
Death Date : 20/12/1996
दया पवार म्हणजेच दगडू मारुती पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे झाला. १९५६मध्ये मुंबईतील पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी लेखनिक व प्रयोगशाळा सहायक म्हणून नोकरीस सुरुवात केली. १९६७मध्ये अस्मितादर्श मध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. दलित साहित्य चळवळीच्या कार्यात १९६८पासून त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९६९मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान मुखपत्रात त्यांचा दलित साहित्यावर लिहिलेला लेख पहिल्यांदा प्रसिद्ध झाला. श्रीलंकेत कोलंबोमध्ये १९७५ला भरलेल्या जागतिक बुद्ध परिषदेलाही ते हजर होते. दया पवार यांनी विपुल लिखाण केले. त्यांपैकी बलुतं हे १९७८मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले. दलित जीवनाची एक वेगळी ओळख त्यांनी यातून करून दिली. १९७९मध्ये राज्य शासनाचा पुरस्कारही त्याला मिळाला. १९८१मध्ये बलुतंची हिंदी आवृत्ती प्रकाशित झाली. त्या आधी कोंडवाडा (१९७४) या त्यांच्या काव्यसंग्रहालाही १९७५मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. १९८२मध्ये फोर्ड फाउंडेशन ची शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त झाली. त्यासाठी ते अमेरिकेला गेले होते. १९८४ला जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे भरलेल्या वर्ल्ड बुक फेअरमध्ये दलित साहित्यावर त्यांनी एक शोधनिबंध सादर केला होता. १९८८ ते १९९४ या कालावधीत ते बालभारती पाठ्यपुस्तक समितीचे सदस्य होते. १९८७ ते १९९४ या दरम्यान महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. १९९०मध्ये दया पवार यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. १९९३मध्ये महाराष्ट्र राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य होते. याशिवाय विटाळ कथासंग्रह (१९८३), बलुतं एक वादळ (१९८३), चावडी स्फुटलेख (१९८३), पासंग(१९९३) व जागल्या स्तंभलेखन, पाणी कुठंवर आलं गं बाई काव्यसंग्रह, कल्लपा यशवंत ढाले यांची डायरी (१९८४), धम्मपद पाली भाषेतील धम्मपदांचा मराठी अनुवाद (१९९१) असे आजवर त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित झाले. फिल्म डिव्हिजनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील लघुपटाचे कथालेखन (१९९३) त्यांनी केले. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपटाच्या पटकथा लेखनातही त्यांचा सहभाग होता. १९९४-९५मध्ये ते परिवर्तन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते.2
Reviews
There are no reviews yet.