Palavi – पालवी
Our Price
₹275.00
Product Highlights
पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला शाळेत जाणारा मुलगा. शालेय वयातच तो व्यसनींच्या संपर्कात आला. बघता बघता व्यसनाच्या विळख्यात ओढला गेला. आईची माया, बहिणींचा जिव्हाळा, – काहीच त्याला रोखू शकलं नाही. ना धड शिक्षण, ना नोकरी, ना व्यवसाय ! रस्ता हेच घर. व्यसन हेच जीवन. पोलीस-कोठडीची हवाही खाल्ली. पण त्याचा अंतरात्मा जागा होता. तो व्यसनातून सुटू पाहत होता. सुटल्यासारखा वाटला, तरी पुन्हा खेचला जात होता. अखेर त्याने व्यसनावर मात केली. एवढंच नाही तर स्वत: एक व्यसनमुक्ती केंद्र उभं केलं. गरगरणाऱ्या भोवऱ्यातून स्वत: बाहेर पडून इतरांना मदतीचा हात देत असलेल्या एका फिनिक्सचं विलक्षण प्रांजळ आत्मकथन.
in stock
Reviews
There are no reviews yet.