Palabharhee Nahee Hay Hay – पळभरही नाही हाय हाय
₹350.00
Product Highlights
दुसऱ्या महायुद्धात वीस लाख हिंदुस्तानी सैनिक लढले. जेथे जेथे ब्रिटिश युद्धातउतरले, तेथे तेथे हिंदुस्तानी सैन्य जाऊन पोचले. फ्रान्स आणि ग्रीसपासून तेमलायापर्यंत त्यांनी जर्मन, इटालियन आणि जपानी फौजांविरुद्ध निकराचा लढा दिला.असे असूनही भारताच्या इतिहासात या सैनिकांना स्थान नाही. आपण भारतीय त्यांनास्वत:च्या भूतकाळाचा भाग मानत नाही. भारतीय भाषांमधील साहित्य त्यांची दखलघेत नाही. भारतीय चित्रपटसृष्टी कधीही त्यांच्या जीवन-मरणाचे चित्रण पडद्यावरआणत नाही. दोस्त राष्ट्रांनी जसे त्यांना अनुल्लेखाने मारले, तसेच आपणसुद्धा त्यांनाविस्मृतीच्या पडद्याआड ढकलून मोकळे झालो.हिंदुस्तानी सैनिकांनी इम्फाळ-कोहिमामध्ये बलदंड जपान्यांना धूळ चारली म्हणूनहिंदुस्तान जपानी साम्राज्याच्या पकडीत सापडला नाही. अन्यथा केवळ हिंदुस्तानचाचनाही, तर संपूर्ण जगाचा चेहरा-मोहरा बदलला असता. जपानी हिंदुस्तानात घुसलेअसते, तर तिकडे जर्मनी, इटली यांचेही बळ वाढले असते आणि नाझी भस्मासुरानेहिंदुस्तानातही पाय रोवले असते. तसे होऊ नये म्हणून ज्यांनी जिवाचे रान केले, प्राणगमावले, अशा अज्ञात वीरांची ही कथा.
Reviews
There are no reviews yet.