PAHILI PHERI? – पहिली फेरी?
₹150.00
Product Highlights
… यशवंतरावजी उत्तम व्यूहरचनाकार व जाणते रणनिती विचारवंत होत… डॉ. मनमोहन सिंग १९६५ WAR INSIDE STORY या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पाकिस्तानविरुद्ध सप्टेंबर १९६५ च्या युद्धातील कार्यवाहीची नोंद यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या रोजनिशीत केली आहे. चीनविरुद्धच्या १९६२ मधील युद्धातील पराभवानंतर संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी घेतलेल्या यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पाकिस्तान युद्धातील घटना व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी यांचा ऊहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय या स्तरांवरून केलेले हे विश्लेषण समाजशास्त्रांचे अभ्यासक तसेच सामान्य वाचक यांना उपयुक्त ठरेल.
Description
“YASHWANTRAO IS AN EXCELLENT STRATEGIST AND A PROFOUND THINKER…` DR. MANMOHAN SINGH. YASHWANTRAO CHAVAN HAS NOTED THE DETAILS OF THE WAR BETWEEN INDIA AND PAKISTAN IN THE YEAR SEPTEMBER 1965 IN HIS DIARY. HE ACCEPTED THE MINISTRY OF DEFENCE AFTER THE DEFEAT BY CHINA IN 1962. AFTER ACCEPTING THE POST, HE TARGETED AT STRENGTHENING THE WILL POWER OF OUR ARMED FORCES. HE ALSO GAVE PREFERENCE TO INCREASE OUR ARMED FORCES. RAM PRADHAN DISCUSSES AND PRESENTS BEFORE US THE WAR TACTICS, THE EFFORTS BY YASHWANTRAO CHAVAN, THE EVENTS DURING THE WAR AGAINST PAKISTAN, AND ALSO THE POLITICAL EVENTS AFTER THE WAR IN THIS CURRENT BOOK. THIS ELABORATION IS DONE FROM THE NATIONAL AND INTERNATIONAL POINT OF VIEW AND WILL PROVE VERY USEFUL TO THE STUDENTS OF SOCIOLOGY AND THE COMMON MEN AS WELL.
Brand
RAM PRADHAN
Birth Date : 27/06/1928
Death Date : 31/07/2020
१९६० ते १९६५ या काळात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणून काम करत असताना नवीन महाराष्ट्राच्या जडणघडण कार्यात सहभागी होण्याची संधी राम प्रधान यांना मिळाली. तसेच यशवंतरावजी संरक्षणमंत्री असताना भारतीय संरक्षण दलाची पुनर्रचना यासारख्या महत्त्वाच्या कार्यात त्यांनी भाग घेतला होता. १९६६ ते १९७७ या काळात त्यांनी जिनिव्हा येथे भारताचे प्रतिनिधित्व केले. १९७२ ते १९७७ या काळात युनोमध्ये संचालक पदावर असताना अविकसित देशांना वाणिज्य व विकास क्षेत्रांमध्ये सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७७-१९८१ या काळात ते महाराष्ट्र राज्याचे गृहसचिव आणि १९८२-१९८५मध्ये राज्याचे मुख्यसचिव होते. तद्नंतर १९८५-८६ साली त्यांनी भारताचे गृहसचिवपद सांभाळले. त्याच काळात पंजाब, आसाम व मिझोराम हे महत्त्वाचे करार त्यांनी केले. भारतीय प्रशासकीय सेवेत ३४ वर्षे सेवा करून ३० जून, १९८६ रोजी ते निवृत्त झाले. कर्तृत्वसंपन्न लोकसेवेबद्दल १९८७ च्या प्रजासत्ताकदिनी त्यांना पद्मभूषण हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना अरुणाचलचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले. १९९०-१९९२ या वर्षांत महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य होते. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके : राजीव गांधींच्या सहवासात वादळ माथा शब्दांचे सामर्थ्य यशवंतराव चव्हाण यांची संसदेतील भाषणे (४ खंड) बंधनाचे ऋण पहिली फेरी? – १९६५ भारत-पाक युद्ध
Reviews
There are no reviews yet.