OCTOPUSSY – ऑक्टोपसी
₹120.00
Product Highlights
एम्ने थंडपणे टेबलापलीकडे दृष्टी टाकली. हे एक निष्ठुर काम असणार होतं आणि बाँड डबल ओ सेक्शनमध्ये असल्यामुळे त्या कामासाठी त्याची निवड झाली होती. ‘या लपून गोळीबार करणा-या सैनिकाला तू ठार केलंच पाहिजे. आणि तेही त्याने एजंट २७२ ला टिपण्याआधी. नीट समजलास नं?’ म्हणजे, हा चक्क खून होता तर… जेम्स बाँड, ब्रिटिश गुप्तहेर ००७, याला आंतरराष्ट्रीय हेरगिरी करताना अशीच निर्दय कामे करावी लागत. वॅÂरिबियनला स्वत:बरोबर भयंकर रहस्य नेणाऱ्या द्वाड मेजरला शोधणे असो, सोदेबीच्या लिलावाच्या दालनात पॅÂबर्जेच्या अंडाकृतीला गुप्तपणे बोली बोलणारा रशियन गुप्तहेर ओळखून काढणे असो, किंवा पूर्व व पश्चिम बर्लिनमधील गल्लीत लपून गोळीबार करणाऱ्या सैनिकाने अत्यंत निर्घृणपणे एका असंभाव्य मारेकऱ्यावर गोळ्या झाडणं असो, बाँड नेहमीच आपली भूमिका योग्य प्रकारे बजावतो. ‘००७ च्या गुप्त रिपोर्टबद्दल पूर्ण माहिती असलेल्या अधिकाऱ्याप्रमाणे इयान फ्लेमिंग, एकमेकांविरुद्ध करण्यात येणाऱ्या गुप्त हेरगिरीच्या क्लिष्ट प्रकरणांचा छडा लावतो!
Description
`M` CAST A COLD GLANCE OVER THE TABLE. FOR SURE, IT MUST BE A VERY DIFFICULT TASK AND AS BOND WAS WITH THE OO SECTION, HE WAS SELECTED TO ACCOMPLISH IT. `YOU MUST FINISH THIS SOLDIER WHO IS FIRING FROM HIS HIDEOUT AND THAT TO BEFORE HE SUCCEEDS IN KILLING THE AGENT 272, HAVE YOU UNDERSTOOD THIS PROPERLY?` OH! THIS WAS A PLAIN MURDER THEN. JAMES BOND, BRITISH SECRET SERVICE AGENT, 007; HE HAS TO UNDERTAKE SUCH RUTHLESS TASKS AS A PART OF HIS INTERNATIONAL MISSIONS. BE IT FINDING THE MAJOR CARRYING THE TERRIBLE SECRETS TO CARIBBEAN OR FINDING THE RUSSIAN SECRET AGENT WHO WAS BIDDING FOR THE EGG-SHAPED FIGURE BY FABERGE DURING THE AUCTION AT SODEBEE, OR BE IT THE RUTHLESS SHOOTING AT AN UNLIKELY ASSASSINATOR BY A SOLDIER WHO HAS ALREADY SHOOT MANY FROM THE GULLIES OF EAST AND WEST BERLIN; BOND ALWAYS ACCOMPLISHED HIS MISSIONS SUCCESSFULLY. IAN FLAMING GIVES A DETAIL AND ELABORATE REPORT OF JAMES BOND`S OPERATIONS, THOROUGHLY.
Brand
IAN FLEMING
Birth Date : 28/05/1908
इयान फ्लेमिंग यांचा जन्म २८ मे, १९०८ रोजी लंडनमधील ग्रीन स्ट्रीट येथे झाला. त्यांचे शिक्षण इटन महाविद्यालायात झाले. उच्चशिक्षणासाठी ते जर्मनी आणि ऑस्ट्रिया येथे गेले. सुरुवातीचा काही काळ रायटर्स न्यूज एजन्सी येथे काम केल्यावर ते शेअर मार्केटमध्ये स्टॉकब्रोकर म्हणून काम करू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पूर्ण वेळ नौदलातील हेरखात्यात असिस्टंट डायरेक्टर म्हणून ते कार्यरत होते. महायुद्धाच्या नंतर इयान फ्लेमिंग यांनी केम्स्ले , संडे टाइम्स या आणि इतर काही वर्तमानपत्रांसाठी परराष्ट्रीय बातमीदार म्हणून काम केले. १९५२ साली त्यांनी कसिनो रॉयल ही थरारक कादंबरी लिहिली. याच कादंबरीतून त्यांनी जेम्स बाँड – एजंट ००७ हे पात्र जगासमोर आणले. पुढील आयुष्यात त्यांनी जेम्स बाँड या पात्राभोवती गुंफलेल्या तेरा कादंबऱ्या लिहिल्या. या सर्व कादंबऱ्या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. या कादंबऱ्यावर चित्रपटही निघाले. १९६२ साली हृदयविकाराशी झगडता झगडता त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी – वॅÂस्परसाठी – एका उडणाऱ्या गाडीवर आधारित चिटी चिटी-बँग बँग ही कथा लिहिली. १२ ऑगस्ट, १९६४ साली केंट येथे त्यांचा मृत्यू झाला.
Reviews
There are no reviews yet.