NOT GONE WITH THE WIND – नॉट गॉन विथ द विंड
₹495.00
Product Highlights
वाऱ्यासोबत न वाहून गेलेली आणि वाऱ्यावर स्वार झालेली जगातील अव्वल चित्रशिल्पे आणि शब्दशिल्पे!हॉलीवूड-बॉलीवूडच्या अंतर्बाह्य दृष्टीक्षेपासह इटालियन, फ्रेंच , ब्रिटिश अशा अनेक अभिनव चाकोऱ्यांचा, विश्वास पाटील यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण ललित धांडोळा.शेक्सपिअर, टॉलस्टॉय, जॉन फोर्ड, दोस्तायव्हस्की, गार्बो, सोफिया लॉरेन, थॉमस हार्डी, शरत्चंद्र, डेव्हिड लीन, मार्लन ब्रँडो, स्टॅन्ले क्युब्रिक, रोमन पोलन्स्की, चार्ली चॅप्लीन, स्टीव्हन स्पीलबर्ग, मेहबूब खान, कोपोला, मधुबाला, के. असिफ, इनग्रिड बर्गमन, व्ही. शांताराम असे अवघ्या विश्वाचे अनेक सगेसोयरे या शब्दांगणात तुमच्याशी हृद्गत करतील!
Description
THIS IS A VERY CREATIVE FORM OF LITERATURE HANDLED VERY CONFIDENTLY BY VISHWAS PATIL. HE HAS ATTEMPTED TO CAPTURE THE CLASS ONE PIECES OF ART, BOTH IN THE WORLD OF PAINTS AND WORDS. HE HAS TRIED TO INTERROGATE THE HOLLYWOOD AND THE BOLLYWOOD THOROUGHLY. WHILE DOING SO VERY BRAVELY AND BOLDLY HE HAS ATTEMPTED TO WALK OVER THE ROUTES OF ITALIAN, FRENCH, BRITISH LANDS. IN THIS WONDERFUL BOOK ALL THE BIG BUDDIES HAVE COME TO MEET YOU. THEY ARE FROM ALL OVER THE WORLD. MOST OF THE UNIVERSALLY FAMOUS PERSONALITIES LIKE SHAKESPEARE, TOLSTOY, JOHN FORD, DOSTOEVSKY, GARBO, SOPHIA LAWRENCE, THOMAS HARDY, SHARATCHANDRA, DAVID LEAN, MARLENE BRANDO, STANLEY KUBRICK, ROMAN POLANSKI, CHARLIE CHAPLIN, STEVEN SPIELBERG, MEHBOOB KHAN, KOPOLA, MADHUBALA, K. ASIF, INGRID BERGMAN, V. SHANTARAM ARE VISITING US THROUGH THIS BOOK.
Brand
VISHWAS PATIL
Birth Date : 28/11/1959
श्री. विश्वास पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाNया इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचे साहित्यिक योगदान, विशेषत: ‘झाडाझडती’ आणि अलीकडच्या ‘नागकेशर’ या कादंबरीचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये पासीघाट (अरुणाचल प्रदेश) येथे झालेल्या तेवीस भारतीय भाषांच्या बहुभाषिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या कादंबNयांची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे होऊन त्या जनप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या ‘पानिपत’ आणि ‘महानायक’ या कादंबNया इंग्रजीमध्ये वेस्टलँड अॅमेझॉन वंÂपनीने तर ‘झाडाझडती’ (A DIRGE FOR THE DAMMED) ही कादंबरी हॅचेट या वंÂपनीने प्रकाशित केली आहे. त्यांना या आधी वेंÂद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार, प्रियदर्शनी नॅशनल अॅवॉर्ड, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार, कोलकात्याचा भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार असे साठहून अधिक साहित्य पुरस्कार गेल्या बत्तीस वर्षांत प्राप्त झाले आहेत. पाटील यांच्या साहित्यगुणांचा गौरव श्री. सुनील गंगोपाध्याय, श्री. अमिताव घोष, इंदिरा गोस्वामी, अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहिाQत्यकांनी जाहीरपणे केला आहे. राज्य शासनाच्या सेवेत असताना आय.ए.एस. अधिकारी या नात्याने त्यांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अनेक वर्षं रखडलेले बांधकाम चौदा महिन्यांच्या अवधीत अग्रक्रमाने पार पाडले. तसेच आपल्या कार्यकाळात पुणे येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर येथील जागेची निश्चिती केली. मराठी व इंग्रजी भाषेतील एक उत्तम वक्ते म्हणून श्री. पाटील यांनी लौकिक मिळविला आहे. शिवाय दिल्ली, लखनऊ, कोलकाता, भुवनेश्वर आदी शहरांतील लिटररी पेÂाQस्टवल व इतर साहित्यविषयक समारंभांमध्ये आपल्या साहित्याचे व भाषेचे दर्शन घडविले आहे.
Reviews
There are no reviews yet.