NOSTRADEMASCHI BHAVISHYAVANI – नॉस्रोदेमसची भविष्यवाणी
₹140.00
Product Highlights
‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल …तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील… …सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल…’’ ‘‘तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल… विलक्षण विजय मिळवील…. सात वर्षांनी त्याच्याविरुद्ध विद्रोह होईल… व्हेनिस नगरी दु:खात बुडून जाईल…’’ नॉस्त्रादेमसची भारताविषयीची ही भविष्यवाणी… चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली…. तंतोतंत खरी ठरलेली…. आणि भावी काळात काय घडेल? ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल… गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल….’’ जगाबरोबरच भारताबद्दलही नॉस्त्रादेमसने वर्तविलेल्या भाकीतांची थक्क करणारी विलक्षण रोमहर्षक अशी नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी.
Description
“THE WOMAN WHO WAS NO MORE HAVING THE RULING POWER WILL COME INTO POWER ONCE AGAIN. HER ENEMIES WILL CONSPIRE AGAINST HER; SHE WILL BE KILLED AT THE AGE OF 67…” “THE GREAT PILOT WILL GAIN ULTIMATE POWER…HE WILL BE VERY SUCCESSFUL…AFTER 7 YEARS HE WILL HAVE TO FACE REBELLION AGAINST HIM… VENICE CITY WILL BE FLOODED BY SORROW…” THESE WERE NOSTRADAMUS` PREDICTION ABOUT INDIA 400 YEARS BACK WHICH CAME INTO REALITY… WHAT WILL HAPPEN IN FUTURE? “THE GREAT LEADER BORN IN THE COUNTRY SURROUNDED BY OCEAN ON ALL THREE SIDES WILL RISE ONE DAY LIKE A STORM, HE WILL DECLARE THURSDAY AS A WEEKLY OFF…” READ IN THIS BOOK THE EXCITING ASTROLOGICAL PREDICTIONS ABOUT THE WORLD AS WELL AS INDIA.
Brand
SURESHCHANDRA NADKARNI
Birth Date : 24/12/1929
Death Date : 22/07/2011
पुण्याच्या वाडिया कॉलेजमधे चाळीस वर्षे प्राध्यापक म्हणून काम केलेले डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी, पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागात वीस वर्षांहून अधिक काळ मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. पुणे विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर डॉ. नाडकर्णींनी दहा-बारा वर्षे सर्प व कीटकांवर संशोधन केले. पुण्याच्या वाडिया कॉलेजमधे अध्यापन करताना त्यांची प्राणिशास्त्रावर पंधराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. डॉ. नाडकर्णी उत्तम क्रीडापटू म्हणून प्रसिद्ध होते. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, खोखो, कुस्ती, हॉकी, मल्लखांब, ब्रिज या खेळांत त्यांना अनेक राष्ट्रीय बहुमान प्राप्त झाले. अखिल भारतीय, आंतरराज्य स्पर्धांचे संयोजन, तसेच पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य क्रीडामंडळावर सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. क्रीडा स्पर्धांसाठी मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी या चारही भाषांतून समीक्षण करणारे ते एकमेव समीक्षक होते. त्यांच्या क्रीडा-ज्ञानकोश या ग्रंथाला १९८९ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. ते पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांचे जनक आहेत. पुण्यात गादीवरील कुस्ती या आधुनिक क्रीडाप्रकाराची सुरुवात त्यांच्यामुळे झाली. डॉ. वसंतराव देशपांडे व ग़जल सम्राज्ञी बेगम अख्तर यांच्या सहवासामुळे त्यांच्या मनात संगीत-गायनाची आवड व समज निर्माण झाली. ते उत्तम तबलावादक होतेच; तसेच सतार, जलतरंग वादनाचा अभ्यासही त्यांनी केला होता. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी लिहिलेल्या उर्दू काव्यातील हुब्बे वतन का जलवा (देश-प्रेम) या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची विद्या वाचस्पती ही पदवी मिळाली होती. त्यांच्या ग़जल या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक महामंडळाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. मराठी नियतकालिकांतून त्यांची सूर आणि शब्द व गाजलेली गीते ही सदरे, तसेच सिनेगीतांवरील टीका व टिप्पणी या लेखमालाही प्रकाशित झाल्या. मराठी, हिंदी, गुजराती व उर्दू भाषांचे संमिश्र मुशायरे भरवण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्यावतीने शिकाऊ ग़जल रचनाकारांसाठी इस्लामपूर येथे १९८७ साली प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन डॉ. नाडकर्णी यांनी केले होते. अन्य व्यासंगांमध्ये फलज्योतिष, हस्तसामुद्रिक आणि हस्ताक्षर यांचा विशेष अभ्यास त्यांनी केला होता. ते उत्तम फोटोग्राफीही करत आणि उत्तम शिकारी म्हणूनही ओळखले जात. त्यांनी आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि लघुपट यांच्यासाठी लेखन केले होते.
Reviews
There are no reviews yet.