NO ORDINARY DAY – नो ऑर्डीनरी डे
₹150.00
Product Highlights
वल्ली या तरुणीची कहाणी…. झरीया नावातल्या कुटुंबात राहणारी….खाणीतील कोळसा वेचत आयुष्य जगणारी…. गावाच्या परिघा बाहेरच जाग तिला माहीत नव्हतं. रेल्वे रुळाच्या पलीकडे राहणा-या वस्तीतल्या राक्षसाना ती भीत असे. हे राक्षस म्हणजे कुष्ठरोगी. आपल्या जन्मदात्या कुटूंबाने पैसे देऊन संगोपनासाठी व कुटूंबाकडे सोपवल्याचे समजल्यावर ती कोलकत्याला येते…..एका डॉक्टरकडून आपल्याला कुष्ठरोग झाला असल्याचे तीला समजते. उपचाराची संधी नाकारून ती रस्त्यावरचे अनिश्चित जीवन अंगिकारते….प्राप्त परिस्थितीत प्रत्येक गोष्टीत ती आनंद समाधान शोधते. अनेक वळणे घेत जाणारा वल्लीचा जीवनप्रवास वाचकांना अस्वस्थ करतो. आणि कुष्ठरोगाच्या सम्रुद्ध निर्मूलनासाठी जगभरातून सांघिक प्रयत्न होण्याची गरज अधोरेखीत होते.
Description
EVEN THOUGH VALLI SPENDS HER DAYS PICKING COAL AND FIGHTING WITH HER COUSINS, LIFE IN THE COAL TOWN OF JHARIA, INDIA, IS THE ONLY LIFE SHE KNOWS. SHE’S FILLED WITH TERROR WHEN SHE GLIMPSES THE MONSTERS LIVING ON THE OTHER SIDE OF THE TRAIN TRACKS — THE LEPERS. WHEN VALLI DISCOVERS THAT HER “AUNT” IS A STRANGER WHO WAS PAID TO TAKE VALLI OFF HER FAMILY’S HANDS, SHE LEAVES JHARIA AND BEGINS A SERIES OF ADVENTURES THAT TAKES HER TO KOLKATA, THE CITY OF THE GODS. VALLI FINDS THAT SHE REALLY DOESN’T NEED MUCH TO LIVE AND IS VERY RESOURCEFUL. BUT WHEN A CHANCE ENCOUNTER WITH A DOCTOR REVEALS THAT SHE HAS LEPROSY WILL VALLI BE ABLE TO FACE LIFE AS ONE OF THE MONSTERS SHE HAS ALWAYS FEARED, OR FLEE TO AN UNCERTAIN LIFE ON THE STREET?
Brand
DEBORAH ELLIS
Birth Date : 07/08/1960
अविकसित, गरीब, मागास राष्ट्रांतल्या मुलांचं खडतर जगणं विकसित देशातल्या माणसांसमोर ठेवणारी एक अत्यंत संवेदनशील लेखिका. तिच्या अत्यंत धाडसी अनुभवांना तिनं तितक्याच रोमांचकारी शैलीत वाचकांसमोर मांडलं. जगभरातल्या सत्तासंघर्षात भरडल्या जाणाऱ्या अबोध, निरागस मुलांची वाताहत हाच तिच्या लेखनाचा केंद्रिंबदू आहे. तिच्या सगळ्याच पुस्तकांना देशविदेशांतून पुरस्कार मिळाले आहेत. गव्हर्नर जनरलचा प्रतिष्ठीत पुरस्कार, स्वीडनचा पीटर पॅन पुरस्कार , द रूथ स्वाटर्झ पुरस्कार , वॅÂलिर्फोनिया विद्यापीठाचे मिडल ईस्ट बुक अॅवॉर्ड , द जेन अॅडम्स बालसाहित्य पुरस्कार , विकी मेटकाल्फ पुरस्कार अशा बऱ्याच प्रतिष्ठीत पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आलं आहे. जगभरात तिची ब्रेडविनर ही ट्रायॉलॉजी खूप गाजली. जगभरातल्या सतरा भाषांमध्ये तिची ही पुस्तकं अनुवादित झाली आहेत. जगभरातल्या वाचकांनी या पुस्तकांना भरभरून प्रतिसाद दिला. तिला रॉयल्टी म्हणून मिळालेल्या रकमेतून लक्षावधी डॉलर्स स्ट्रीट किड्स इंटरनॅशनल आणि वुमन फॉर वुमन या संस्थांना दान देण्यात आले आहेत. वुमन फॉर वुमन ही संस्था अफगाणिस्तानातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या आणि निर्वासितांचं आयुष्य जगणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करते. डेबोरा एलिस ही ओन्टारिओ इथं राहते. स्त्री-मुक्तीवादी कार्यकर्ती म्हणून आणि शांतता मोहिमेअंतर्गत तिनं जगभरातल्या देशांत काम केलं आहे.
Reviews
There are no reviews yet.