NISARG ANI ITAR GOSHTI – निसर्ग आणि इतर गोष्टी
₹350.00
Product Highlights
निसर्ग आणि पक्षी यांच्यात एक अनोखे नाते आहे. निसर्गाच्या ऋतूप्रमाणे पशू-पक्ष्यांचे मनही बदलत असते. दुबळे जीव हिंस्त्र पशूंचे सहज भक्ष्य होतात. त्यांच्या तुलनेने आपले बंदिस्त असलेले मानवी जीवन सुरक्षित आहे, या कल्पनेने आपण सुखावतो. निष्पाप निरागसतेला काहीच अर्थ राहत नाही. प्राण्यांची जगण्यासाठी असलेली धडपड केविलपाणी वाटते; पण त्यांना कधीतरी वाचवायला त्यांचे मित्र एकत्रित येतात. जसे नागाचा फडशा पाडून पोपट व मुंगूस खारूताईसाठी धावून येतात. मदत करायची वृत्ती प्राण्यांमध्ये पण दिसून येते. जसे वाट चुकलेल्या देवमाशाला राजहंस समुद्रात परत पोहोचवितो व गवा सहानुभूतीने लांडग्याचा प्राण वाचवितो. पशू-पक्ष्यांतील जीवनाचे अनेक बारकावे पाहून आपण थक्क होऊन जातो. वृक्ष, प्राणी व पक्षी आपल्या स्वाभाविक प्रेरणांनी जगत असतात व त्यांच्या माध्यमातून रंगीबेरंगी सौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा परमेश्वराने पृथ्वीला वरदान म्हणून दिलेल्या आहेत, असे वाटते. परमेश्वर एक श्रेष्ठ चित्रकार आहेच. पाच पुस्तकांचा संच – १. गीर जंगल आणि इतर गोष्टी २.जीवदान आणि इतर गोष्टी ३. कौतुक आणि इतर गोष्टी ४. मैत्री आणि इतर गोष्टी ५. सृष्टी आणि इतर गोष्टी
Reviews
There are no reviews yet.