MRUTYU MAZYA UMBARTHYASHI – मृत्यू माझ्या उंबरठ्याशी
₹195.00
Product Highlights
‘‘मृत्यूच्या हातात कसलंसं फर्मान आहे. आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!’’ …मृत्यू …अटळ सत्य… धडकी भरवणारं, वाईट, खिन्न मानलं जाणारं वास्तव. जीवनातील या मूलभूत वास्तवाकडं पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन आढळतात. कुणी मृत्यू हा शेवट मानतं. कुणी नव्या जीवनाचा आरंभ, तर कुणी मृत्यू हा फक्त देहरुपी वस्त्राचा त्याग मानतात. कुणाला मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता वाटते; तर कुणाला अंतिम पूर्णविराम… पण देहाची चेतना संपली की, मनाचीही संपते? आत्मा म्हणजे काय? तो कुठं असतो? जाणिवांचं काय होतं… असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच राहतात. मृत्यू म्हणजे आघात, वियोग, क्लेष, दु:ख, रडारडी असा हा विषय गहन गंभीर मानला जातो. मात्र या मृत्यू लेखसंग्रहात बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाचे मृत्यूविषयक विचार खुसखुशीत शैलीत व रोखठोक बाण्यानं प्रकट झाले आहेत. तसंच काही विलक्षण प्रतिभावंतांवर त्यांनी लिहिलेल्या मृत्यूलेखांतून त्या त्या व्यक्तित्वांचे विविधरंगी पदर वाचकाला अस्वस्थ करतात, हसवतात, डोळे दिपवतात; तर कधी अंतर्मुख करतात.
Description
THE DEATH HAS A WARRANT IN ITS HANDS, WHOSE NAME IS AT THE TOP TODAY? DEATH, THE ETERNAL TRUTH, THE FACT WHICH IS BREATH-TAKING, SAD, GLOOMY. EVERYONE LOOKS AT DEATH FROM A DIFFERENT ASPECT. SOME CONSIDER IT TO BE THE END OF LIFE, AND FOR SOME IT IS BEGINNING OF A NEW LIFE. SOME FEEL THAT DYING IS CHANGING BODIES BY THE SOULS. SOME FEEL THAT DEATH IS BEING NOTHING. AND SOME FEEL THAT IT IS A FULL-STOP TO EVERYTHING. WHAT IS IT ACTUALLY? WHEN THE BODY BECOMES LIFELESS, WHAT HAPPENS TO THE SOUL? WHAT HAPPENS TO THE MIND SITUATED IN THE BODY? WHAT HAPPENS TO THE FEELINGS IN IT? MANY SUCH QUESTIONS REMAIN UNANSWERED. DEATH IS CONSIDERED TO BE A BLOW, BEREAVEMENT, AN AGONY, A PAIN, MUCH CRYING, MUCH MOURNING. DEATH IS A VERY SERIOUS TOPIC. BUT THIS VERY DEATH MEETS US IN EVERY ARTICLE UNDER THIS BOOK IN THE PECULIAR STYLE OF THE AUTHOR IN A VERY STRAIGHT FORWARD WAY. HIS ARTICLES ON MANY OF THE FAMOUS PERSONALITIES REVEAL THE UNKNOWN SIDES. THEY MAKE US LAUGH, THINK, CRY, AND THEY BEDAZZLE US.
Brand
KHUSHWANT SINGH
Birth Date : 02/02/1915
Death Date : 20/03/2014
वकील, पत्रकार, कादंबरीकार व राजकारणी अशी विविध क्षेत्रे गाजविणाऱ्या खुशवंतिंसग यांचा जन्म पंजाबमधील हदाली (आता पाकिस्तानात) येथे झाला. त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण दिल्ली व लंडन येथून घेतले. लाहोर कोर्टात आठ वर्षे वकिली केल्यावर १९४७ मध्ये भारतीय दूतावासात, तर १९५१ मध्ये ऑल इंडिया रेडिओ येथे पत्रकार म्हणून कामगिरी बजावली. त्यानंतर युनेस्कोच्या मास कम्युनिकेशन विभागातही त्यांना पाठविण्यात आले. वरील दोन विभागांतील कामाने त्यांना साहित्य क्षेत्राकडे-लेखनाकडे जाण्यास उद्युक्त केले. १९५६ मध्ये भारत सरकारतर्फे योजना नावाचे नियतकालिक सुरू करून त्याचे संपादकत्वदेखील निभावले. यानंतर द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, नॅशनल हेरल्ड व हिदुस्थान टाइम्स ही नियतकालिकेही त्यांनी बाजारात आणली. भारत सरकारतर्पेÂ पद्मभूषण देऊन (१९७४) त्यांना गौरविले गेले; परंतु (१९७८) ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत लष्करी फौजा अमृतसरच्या गुरुद्वारात घुसविल्याच्या निषेधार्थ त्यांनी तो पुरस्कार परत केला. त्यांना २००७ मध्ये पद्मविभूषण देऊन नावाजले गेले. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. उपरोधपूर्ण, विनोदी, धर्मनिरपेक्ष; परंतु झोंबणारे थेट भाष्य असणाऱ्या लेखनासाठी, व कवितेविषयी प्रेम असणारे म्हणून ते कायम लक्षात राहतात.

Reviews
There are no reviews yet.