MOHINI – मोहिनी
₹250.00
Product Highlights
ही कथा आहे एका मनोरुग्ण स्त्रीमनाची. समाजात मनोरुग्णाला दिली जाणारी वागणूक ‘वेड्याला अधिक वेडं करणारी’ असते. ‘मोहिनी’च्या या कथेत लेखिकेने एक वेगळा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला आहे. मनोरुग्णासारखा एक वेगळा ‘पट’ घेऊन साकारणारी ‘मोहिनी’ वाचकाला आपल्या भावभावनांनी खिळवून ठेवते. विषय निवडीपासून लेखिकेनं एका अवघड विषयाचं आव्हान सामथ्र्यानं पेललं आहे. विषय गंभीर असूनही वाचकाला खिळवून ठेवण्याची किमया मोहिनीमध्ये आहे. यामध्येच मोहिनीचं यश सामावलं आहे. मनोरुग्णाची कारणमीमांसा खोलात जाऊन वास्तवाला उजाळा देणारी आहे. त्यावरील मानसशास्त्रीय उपायांचे उपयोजनही लेखिकेच्या अभ्यासपूर्ण चिंतनाची साक्ष देते. मनोरुग्णाच्या मनाचा कल अध्यात्माकडे वळवून मानसशास्त्रीय उपायामध्ये एक दिशा सूचित केली आहे. एका वेगळ्या विषयामुळे मराठी साहित्यक्षेत्रात ‘मोहिनी’ लक्षवेधी ठरली तर नवल नाही.
Description
THIS IS A STORY OF A MENTALLY ILL PATIENT. THE TREATMENT WHICH SUCH PATIENTS RECEIVE FROM THE SOCIETY MAKES HER MORE ILL, MENTALLY. THE AUTHOR HAS TRIED A VERY DIFFERENT SUBJECT THROUGH THIS BOOK. NOT MUCH IS WRITTEN WITH A MENTAL PATIENT AS THE MAIN CHARACTER OF A STORY. BUT THE AUTHOR HAS DONE SO VERY SUCCESSFULLY. `MOHINI` SUCCEEDS IN CAPTURING THE MINDS OF ALL, FROM START TO END. THE TOPIC ITSELF IS VERY SERIOUS. STILL IT CAPTIVATES THE MINDS; THIS IS THE STRONGEST POINT OF IT. THE AUTHOR HAS RESEARCHED WELL BEFORE WRITING THIS NOVEL. SHE HAS DONE HER HOMEWORK REGARDING THE SYMPTOMS AND THE COURSE OF TREATMENT. SHE HAS SUGGESTED A NEW WAY FOR TREATING SUCH PATIENTS THROUGH MEDITATION AND SPIRITUALITY. NO WONDER, `MOHINI` IS SO EXCLUSIVE.
Brand
PARU MADAN NAIK
पारू मदन नाईक यांचा जन्म दि. १९ एप्रिल, १९५८ रोजी बेळगाव येथे झाला असून, त्यांचं शिक्षण पी.यू.सी. पर्यंत झाले आहे. त्यांचे वास्तव्य कोल्हापूर येथे असून त्या गृहिणी आहेत. त्यांना संगीताची विशेष आवड आहे. त्यांची याआधीही मोहिनी या नावाची एक कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड असून त्या पद्मश्री रणजित देसाई ग्रंथालय कोवाड, जिल्हा कोल्हापूर येथे चालवतात.
Reviews
There are no reviews yet.