MELTDOWN – मेल्टडाउन
₹300.00
Product Highlights
तुमच्या देखत तुमचं जग कोलमडून पडत असताना तुम्ही पळणार तरी कुठे? सॅम्युएल स्पेन्डलव्ह फार घातक खेळ खेळत आहे. बर्टनच्या साम्राज्याशी टक्कर घेतलेल्या दलालाची, त्या गूढ व्यक्तिमत्त्वाच्या खानची गुप्तपणे माहिती मिळवण्याचं काम प्रसारमाध्यमाच्या अनभिषिक्त सम्राटासाठी करण्याचं त्याने मान्य केलं होतं, कारण बर्टनला खानचा सूड घ्यायचा होता. हे काम त्याला पॅरिसच्या शेअर बाजारातून करायचं होतं. सुरुवातीला तिथलं तणावग्रस्त वातावरण सॅम्युएलला भावलं नाही, पण नंतर तो रुळला आणि त्याला ते आवडायला लागलं. काही काळ सगळं सुरळीत चाललेलं होतं. पण प्रसंगी ऐकमेकाचे गळेसुद्धा कापणाऱ्या या आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारातल्या धसमुसळ्या वातावरणात काहीच गृहीत धरून चालत नाही. जेव्हा त्याची आकर्षक सहकारी, गूढरीत्या अचानक नाहीशी होते, तेव्हा त्याचं जग एक एक तुकड्यानी कोलमडायला लागतं. जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कोसळायला लागली, तेव्हा त्यासाठी सॅम्युएलला जबाबदार ठरवण्यात आलं आणि मग सगळेच त्याच्या मागे लागले – शत्रू, सहकारी आणि अर्थातच पोलीसही! लपण्यासाठी जेव्हा त्याने पॅरिसच्या अंडरवल्र्डमध्ये आसरा घेतला, तेव्हा तिथे कल्पनेपेक्षाही भयानक प्रकार चालत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने सुरुवातीला जो खेळ मांडला होता, त्याचे नियम आता पार बदलले होते. त्याचं जग कोलमडून पडायच्या आधी त्याला सत्य समजणार होतं का? कारण एक गोष्ट अटळ होती, . . . . . . .
Description
SAMUEL SPENDLOVE, ONE OF THE BRIGHTEST YOUNG ACADEMICS AT OXFORD, HAS GIVEN IT ALL UP TO WORK UNDERCOVER FOR WILLIAM BARTON, OWNER OF A MASSIVE MEDIA EMPIRE. HIS REASONS ARE COMPLICATED, BUT HE`S FINDING HE GETS A THRILL OUT OF WORKING FOR KHAN, THE LEGENDARY MARKET TRADER, WORKING OUT OF THE PARIS OFFICE OF ROPNER`S BANK, WHOSE DEALINGS HAVE BEEN KNOWN TO BRING NATIONS TO THEIR KNEES. BARTON WANTS INFORMATION ABOUT KHAN. HE WANTS REVENGE OVER A MAN WHO HAS BESTED HIM ONCE. SPENDLOVE ASSUMES HE WANTS TO ENSURE IT IS ONLY THE ONCE…SPENDLOVE ENJOYS BOTH SIDES OF THIS GAME, UNTIL IT ALL UNRAVELS AND HE FINDS HIMSELF SIMULTANEOUSLY ACCUSED OF ALMOST BRINGING DOWN THE GLOBAL ECONOMY AND OF THE MURDER OF KAZ DAY, A GLAMOROUS COLLEAGUE ON THE TRADING FLOOR. HE GOES INTO HIDING IN THE SURREAL AND DANGEROUS WORLD OF UNDERGROUND PARIS CHASED BY THE POLICE, BY KHAN, THE BANK AND WILLIAM BARTON…AND HELPED BY KAZ`S BICURIOUS LOVER, LAUREN. BUT WHO FRAMED HIM AND WHY?
Brand
MARTIN BAKER
मार्टिन बेकर : हे पारितोषिक विजेते लेखक पत्रकारही आहेत. डेली टेलिग्राफ, टेलिग्राफ ऑन लाइन, ऑब्झव्र्हर आणि स्वेअर मिले मासिकासाठी मार्टिन नियमितपणे लिखाण करतात. १९९० ते १९९७ सालापर्यंत ते पॅरिसच्या इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्युनचे पहिले गुंतवणूकविषयक संपादक होते. याशिवाय इंडिपेंडण्ट, द टाइम्स आणि द रेडिओसाठीही त्यांनी काम केले आहे. बीबीसी टेलिव्हिजनसाठी त्यांनी अनेक फिल्म बनवल्या. ए फूल अॅन्ड हिज मनी (१९९७) या नावाजलेल्या पुस्तकाखेरीज त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
Reviews
There are no reviews yet.