Meena : Afghan Mukticha Aakrosh – मीना : अफगाणमुक्तीचा आक्रोश
Our Price
₹150.00
Product Highlights
१९५५ नंतरचा अफगाणिस्तान. संधिसाधू अफगाण्यांनी रशियाला आत घेतलं. रशियाला हुसकावण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तानात घुसलीच. दोन महासत्तांचा जोरदार सामना अफगाणिस्तानच्या भूमीवर सुरू झाला. यातून उदय झाला हिंस्र तालिबानींचा. या धुमश्चक्रीत होरपळली अफगाणिस्तानची जनता. अगदी दारुण ससेहोलपट झाली अफगाण स्त्रियांची.
या बलाढ्य षड्यंत्राविरुद्ध उभी राहिली विशीतली तरुणी – ‘मीना’! तिनं या बलाढ्य सत्तांविरुद्ध जागृतीचं भूमीगत कार्य उभारलं. तिच्या भोवती जमल्या नवरा-बाप-भाऊ-मुलगा गमावलेल्या अनेक स्त्रिया. तिनं उभी केली संघटना. पण तिसाव्या वर्षी ‘मीना’चा दुर्दैवी अंत झाला. तिची ही चरित्रगाथा — जिवाला चटका लावणारी!
in stock
Reviews
There are no reviews yet.