MARKER – मार्कर
₹350.00
Product Highlights
धष्टपुष्ट अंगाचा, अत्यंत निरोगी प्रकृती असलेला सीन मॅकगिलिन न्यूयॉर्कमधल्या सेंट्रल पार्कमध्ये स्केटिंग करत असताना धडपडतो आणि त्याचा पाय मोडतो. अठ्ठावीस वर्षांचा हा तरुण पायावरच्या साध्या ऑपरेशननंतर चोवीस तासांच्या आत अचानक मरतो. एका मुलाची आई असलेली छत्तीस वर्षांची डार्लीन मॉर्गन ही अशीच आणखी एक निरोगी स्त्री गुडघ्यावरच्या एका सोप्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि ऑपरेशनला चोवीस तास उलटायच्या आत तीही मरते. न्यूयॉर्क शहरातले डॉक्टर लॉरी माँटगोमेरी आणि डॉक्टर जॅक स्टेपल्टन हे दोघं मेडिकल एक्झॅमिनर असतात. तरुण, निरोगी माणसांच्या साध्या ऑपरेशननंतर पडत चाललेल्या बळींची वाढत चाललेली प्रकरणं पोस्ट मॉर्टेममध्ये त्यांच्या लक्षात येऊ लागतात… ओसीएमई आणि मॅनहटन जनरल हॉस्पिटल या दोन्हींच्या विरोधाला न जुमानता लॉरी या भानगडीचा तपास नेटानं चालू ठेवते… नेमके तरुण आणि निरोगी पेशंटच का मरताहेत, हे गूढ तिला काही केल्या उकलत नसतं, पण एक गोष्ट तिच्या लक्षात येते – हे नैसर्गिक मृत्यू नसून खून आहेत आणि कोणी तरी अत्यंत हुशारीनं, काही तरी बेमालूम पध्दत वापरून हे हत्यांचं सत्र घडवून आणतंय!… …त्यातच लॉरीला लागोपाठ जबरदस्त धक्के बसतात. जॅकबरोबरच्या प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेल्या मानसिक तणावांना तोंड देत असताना तिला समजतं, की स्तनांच्या कॅन्सरच्या जीनचा मार्कर आपल्यात आहे! त्यातच ती स्वत:च या हत्यासत्रामध्ये अशा पध्दतीनं गुरफटत जाते, की अचानक ती स्वत:च खुन्याच्या हातात सापडते…
Description
THE MASTER OF THE MEDICAL THRILLER RETURNS WITH HIS MOST HEART-POUNDING TALE YET. TWENTY-EIGHT-YEAR-OLD SEAN MCGILLIN IS THE PICTURE OF HEALTH, UNTIL HE FRACTURES HIS LEG WHILE IN-LINE SKATING IN NEW YORK CITY`S CENTRAL PARK. WITHIN TWENTY-FOUR HOURS OF HIS SURGERY, HE DIES. A THIRTY-SIX-YEAR-OLD MOTHER, DARLENE MORGAN, HAS SURGERY TO REPAIR A TORN LIGAMENT IN HER KNEE. AND WITHIN TWENTY-FOUR HOURS, SHE IS DEAD. NEW YORK CITY MEDICAL EXAMINERS DR. LAURIE MONTGOMERY AND DR. JACK STAPLETON ARE BACK, IN ROBIN COOK`S ELECTRIFYING TWENTY-FIFTH NOVEL. LAST SEEN IN VECTOR, THE DOCTORS NOW CONFRONT A BALLOONING SERIES OF PUZZLING HOSPITAL DEATHS OF YOUNG, HEALTHY PEOPLE WHO HAVE JUST UNDERGONE SUCCESSFUL ROUTINE SURGERY. DESPITE INSTITUTIONAL RESISTANCE FROM HER SUPERIORS, AND FROM THE STAFF AT MANHATTAN GENERAL, LAURIE DOGGEDLY PURSUES THE INVESTIGATION AS THE DEATH TOLL MOUNTS. IT SEEMS IMPOSSIBLE TO DETERMINE WHY AND HOW THE PATIENTS ARE DYING, YET SHE COMES TO SUSPECT THAT NOT ONLY ARE THE DEATHS RELATED THEY`RE INTENTIONAL, SUGGESTING THE WORK OF A REMARKABLY CLEVER HEALTHCARE SERIAL KILLER WITH A VERY UNUSUAL MOTIVE, WHICH MAY INVOLVE FRIGHTENING TIES TO BOTH DEVELOPING GENOMIC MEDICINE AND THE ECONOMICS OF MODERN-DAY HEALTHCARE. AS IF TO HEIGHTEN THE TENSION, LAURIE IS DEALT A DOUBLE BLOW: WHILE COPING WITH JACK`S INABILITY TO COMMIT TO THEIR RELATIONSHIP, SHE DISCOVERS SHE CARRIES A GENETIC MARKER FOR A BREAST-CANCER GENE. WITH HER PERSONAL LIFE UNRAVELING, THE NEED FOR ANSWERS BECOMES MORE URGENT, ESPECIALLY WHEN SHE IS INEXORABLY PULLED INTO THE NIGHTMARE AS A POSSIBLE VICTIM HERSELF. TIME WINDS DOWN, AND LAURIE AND JACK MUST RACE TO CONNECT THE DOTS-AND SAVE HER LIFE. WITH HIS SIGNATURE BLEND OF SUSPENSE AND SCIENCE, ROBIN COOK DELIVERS AN ELECTRIFYING PAGE-TURNER AS VIVID AS TODAY`S HEADLINES. DR. ROBIN COOK IS CURRENTLY ON LEAVE FROM THE MASSACHUSETTS EYE AND EAR INFIRMARY. HE LIVES AND WORKS IN FLORIDA.
Brand
ROBIN COOK
Birth Date : 04/05/1940
रॉबिन कुक हे वेस्लेयन विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठाच्या वैद्यकीय शाखेचे पदवीधर आहेत. हार्वर्डमध्ये त्यांनी आपले पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या पत्नी व मुलासह ते आलटून पालटून बोस्टन, नेपल्स आणि फ्लोरिडामध्ये असतात. वैद्यकीय सत्य आणि स्वत:ची कल्पनाशक्ती यांच्या यशस्वी संयोगाने त्यांनी विक्रमी मागणी असलेल्या पुस्तकांची एक साखळीच निर्माण केली आहे. त्यांच्या वैद्यकीय रोमांचकथा, वैद्यकशास्त्रातील संभाव्य तांत्रिक गोष्टी आणि नैतिक प्रश्न यांची जाणीव करून देण्यासाठी आहेत. कुक हे वुड्रो विल्सन सेंटर च्या विश्वस्त मंडळातील खासगी सदस्य आहेत. या सदस्यांची नेमणूक सहा वर्षांसाठी अमेरिकेचे अध्यक्ष करतात. आजपर्यंत त्यांनी अवयवदान, जैवअभियांत्रिकी जननक्षमतेवर उपाय, संशोधनासाठी अनुदान, नियोजित संगोपन, वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार, औषध संशोधन, अवयव रोपण इत्यादी विषयांचा वेध घेतला आहे. त्यांच्या कादंबऱ्यानी देशात चर्चेची वादळे उठतात. स्टेम सेल सारख्या लोकांना अपरिचित विषयांवरही त्यांनी लिहिले आहे. वाचकांचे रंजन करण्याबरोबरच अशा विषयांबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणे आणि त्यातल्या नैतिक समस्यांची जाणीव निर्माण करणे हा त्यांच्या कादंबऱ्यामागचा उद्देश आहे. आपल्या पुस्तकांच्या लोकप्रियतेचे रहस्य सांगताना ते म्हणतात, मुख्य कारण म्हणजे, आपल्याला लक्षात येतं की, आपण सगळेच असुरक्षित आहोत. कधी ना कधी आपण सगळेच पेशंट असणार आहोत.
Reviews
There are no reviews yet.