MARATHESHAHICHE ANTARANG – मराठेशाहीचे अंतरंग
₹170.00
Product Highlights
“या ग्रंथात- – संभाजी राजांना मोगलांनी कैद केल्यावर त्यांना सोडविण्यासाठीचे काही प्रयत्न झाले की नाही? झाले असल्यास ते कोणते? – छ. राजाराम महाराजांची पहिली राणी- प्रतापराव गुजरांची कन्या, ही लग्नानंतर लवकरच मरण पावली, असे इतिहासकार मानत आले. प्रत्यक्षात ती सन १७१९ पर्यंत जिवंत होती, मग ती होती कोठे? -गिरजोजी यादवासारखा एक देशमुख- वतनासाठी काय काय करत होता? वतनासाठी वतनदार काय काय खटपटी लटपटी करत? – खेडच्या लढाईत सेनापती धनाजी जाधव ताराबाईचा पक्ष सोडून शाहू महाराजांना का जाऊन मिळाला? -सन १७१४ मध्ये पन्हाळगडावर महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र शिवाजीराजे यांच्या राजवटीचा अंत घडवून आणणारी ‘राजवाड्यातील क्रांती’ कोणी व घडवून आणली? – पुण्याच्या पेशव्यांशी प्रसंगी मुत्सद्देगिरीने वागून, संघर्ष करून, कोल्हापूरकर राणी जिजाबाई यांनी आपल्या राज्याचे रक्षण कसे केले? – माणुसकीला काळिमा फासणारी मराठेशाहीतील स्त्रीगुलामांची खरेदी-विक्री कशी होत असे? – मराठेशाहीतील छत्रपती, शिवरायांचे वंशज यांची सत्ता का लयाला गेली? यांसारख्या मराठेशाहीच्या अंतरंगातील अनेक प्रश्नांचा शोध घेत आहेत प्रसिद्ध इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार. “
Description
“WHEN SAMBHAJI RAJE WAS ARRESTED WERE ANY ATTEMPTS MADE FOR HIS RELEASE? WHAT WERE THEY? IT IS SAID THAT THE FIRST QUEEN OF CHHATRAPATI RAJARAM MAHARAJ- DAUGHTER OF PRATAPRAO GUJAR- DIED IMMEDIATELY FOLLOWING MARRIAGE. BUT IN REALITY, SHE WAS ALIVE TILL 1719. IF SO, WHERE WAS SHE? A DESHMUKH LIKE GIRJOJI YADAV PLAYED MANY TRICKS FOR THE ‘WATAN’; WHAT WERE THESE? WHAT WERE THE WATANDARS DOING FOR THE WATAN? WHY DID DHANAJI JADHAV LEAVE TARABAI AND JOIN SHAHU MAHARAJ DURING THE BATTLE AT KHED? THE REVOLUTION ENDING THE REGIME OF MAHARANI TARABAI AND HER SON SHIVAJI RAJE TOOK PLACE ON PANHALGAD. WHO WAS BEHIND THIS ‘PALACE REVOLUTION’? HOW DID QUEEN JIJABAI OF KOLHAPUR PROTECT HER KINGDOM WHILE DEALING WITH THE PESHWAS OF PUNE? HOW DID THE INHUMAN SELLING AND BUYING OF FEMALE SLAVES TAKE PLACE DURING MARATHA REGIME? WHY DID THE REGIME OF SHIVAJI MAHARAJ’S DESCENDANTS COME TO AN END? THE FAMOUS HISTORIAN DR. JAISINGRAO PAWAR SEEKS ANSWERS TO MANY SUCH QUESTIONS. “
Brand
DR.JAYSINGRAO PAWAR
Birth Date : 30/12/1935
डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (सर्वप्रथम) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्याथ्र्यांसाठी २० क्रमिक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला १९६४ मध्ये सुरुवात झाली. या विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एवूÂण २५पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे ४५हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक – सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी १९९२ मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे १२०० पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ २००१मध्ये प्रसिद्ध केला. भारतातील १६ भाषांमध्ये तसेच रशियन, फ्रेंच, इटालियन, जपानी या परकीय भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे. यांपैकी कन्नड, कोकणी, इंग्लिश, जर्मन, उर्दू व तेलुगू, आणि हिंदी भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. गुजराती व रशियन भाषेतील ग्रंथ प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या संस्थेचे संचालक आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास इत्यादी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्लिश) या ग्रंथाचे प्रकाशन करून शाहूचरित्रकार म्हणून पुणे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. पवार यांनी ऐतिहासिक, तसेच इतर अनेक विषयांवरील २५पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. त्यांना इतिहासविषयक संशोधनातील आणि सामाजिक कार्याबद्दल अनेक व्यक्ती व संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Reviews
There are no reviews yet.